!! रामकृष्णहरि !! शांतीचेनी मंत्रे मंत्रुनी विभुती! लाविली देहाप्रती सर्व अंगा!! आज नाथषष्ठी, शांतीब्रम्ह पदी अधिष्ठीत संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी शांतीरुप महामंत्राची विभुती सर्वांगी चर्चुन संपुर्ण आयुष्यभर अढळतेने आणी निष्ठेने शांतीव्रत आचरणात आणले. आज दिनी महाराजांनी इतर सर्व उपाधींचा जलतत्वात विलय करुन ते अखंडीत अश्या नित्य समाधी अवस्थेला किंबहुना ब्रम्हरुपतेला प्राप्त झाले. एका जनार्दनी नित्यता समाधी ! वाउग्या उपाधी तोडियेल्या !! माउली ज्ञानोबाराय म्हणतात, परम् ब्रम्ह आणी ब्रम्हरुप होणाऱ्याच्या योग्यतेतील अंतर हे प्राप्त शांतीमुळे नाहीसं होऊन तो परम् पुरुष शांतीब्रम्ह होतो. ब्रम्हरुपतेला प्राप्त किंवा ब्रम्ह होण्यास योग्य असलेल्या अधिकारी पुरुषाच्या ठिकाणी अविचल शांतीचा वास असतो. किंबहुना अंगी अखंड शांती असेल तरच तो ब्रम्ह होतो. ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा । तैं ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥ जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, अंतःकरणात शांतीचा उदय झाला तर दुःख निवृत्त होऊन सुखरुपता प्राप्त होते. सुख देते शांती । तुका म्हणे धरितां चित्तीं ॥ त्यामुळेच जीवाने चित्तात शांतता धारण करुन ती अंगी बाणवली तर जीवदशा समाप्त होऊन उत्तम आणी अविनाशी अश्या परम् पदाची व शिवदशेची प्राप्ती सहजासहजी होईल. शांती धरणें जीवासाठीं । दशा उत्तम गोमटी ॥ अश्या ह्या शांतीरुप सद्वृत्तीचे धारक शांतीब्रम्ह, परब्रम्ह पदी विराजीत शुद्ध वारकरी सांप्रदायाचे पथदर्शक दिपस्तंभ ज्यांचे वाङमयीन प्रकाशाने साधक, मुमुक्षुंच्याच नव्हे मुक्तासितांच्याही वाटा उजळुन सुयोग्य व सुचारु असा सुपंथ दृष्टिंगत् होतो. अश्या शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांचे चरणी शिरसाष्टांग दंडवत.
#

🙏संत एकनाथ महाराज पुण्यतिथी

🙏संत एकनाथ महाराज पुण्यतिथी - ShareChat
438 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post