#

motivational post

👁 निर्णय घेण्यापूर्वी तपासून पहाच! एक सुंदर राज्य होते. तेथील राजाकडे एक खुपच चतुर आणि बुद्धिमान पोपट होता. यामुळे राजा त्याच्यावर नेहमी खूष असे. एकदा तो पोपट राजाला विनंती करतो की, मला आई-वडिलांना भेटायला जायचे आहे. राजा पोपटाची विनंती मान्य करतो आणि त्याला सांगतो, बरोबर 5 दिवसांत भेटून परत यायचे. यावर खूष होऊन तो पोपट आपल्या आई-वडिलांना भेटतो. 5 दिवस झाल्यानंतर तो राजाकडे जाण्यासाठी तयार असतो. राजाकडे परत येताना आपण काहीतरी भेट घेऊन जावू असा तो विचार करतो. पोपटाला रस्त्यात एक अमृताचे झाड दिसते, तो विचार करतो. या झाडाचे एक फळ तोडून राजाला देऊयात. यामुळे राजा नेहमी चिरतरूण राहिल व कधीही मरणार नाही. मात्र हे झाड उंच पर्वतावर असते. ते फळ तोडण्यासाठी पोपटाला खूपच मेहनत घ्यावी लागते. यामुळे तो खूप थकतो. मग रात्री तिथेच थांबून सकाळी परत निघण्याचे नक्की करतो. मात्र रात्री एक विषारी साप ते फळ खातो. त्यामुळे ते फळ विषारी बनते. पोपटाला हि गोष्ट माहित नसल्यामुळे तो तेच फळ घेऊन राजाकडे येतो व राजाला खायला देतो. तेव्ही तेथील एक मंत्री ते फळ अगोदर कुत्र्याला खायला घालतात. त्यावेळी ते कुत्रे तडफडून मरते. हे पाहून राजा क्रोधित होतो व पोपटाचे मुंडके धडापासून वेगळे करतो. राजा ते उरलेले फळ उचलून बाहेर फेकतो. काही वर्षांनंतर त्याजागेवर एक झाड उगवते. यानंतर राजा सर्व राज्यात सूचित करतो की, या झाडाचे फळ कुणीही सेवन करायचे नाही. कारण हे झाड त्या फळाप्रमाणे विषारी आहे. एके दिवशी एक वृद्ध गृहस्थ त्या झाडाखाली विश्राम करता असतो. त्याला झाडाविषयी काहीच माहित नसते. तो त्या झाडाचे फळ खातो आणि चिरतरूण होतो. ही गोष्ट राजाला समजते आणि त्याला कळते की, त्या झाडाचे फळ विषारी नाहीत. या सर्व घटनेमुळे राजाला पश्चाताप होतो की, आपण एक निरपराधाला शिक्षा दिली. या गोष्टीतून हे शिकायला मिळते की, की कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा करण्यापूर्वी, एकदा त्याची चूक आहे किंवा नाही हे पहिले पाहिजे. कारण चुकून आपल्याकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. #motivational post
458 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

motivational post

281 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

motivational post

523 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

motivational post

559 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

motivational post

694 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

motivational post

863 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post