श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
1K views • 4 days ago
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ मजूर एक बिकट समस्या!*
(Copy Paste)
*देशातील शेतीधंदा मोडीत निघतोय.*
*रोजगार न मीळणे ही समस्या आता राहीलेली नाही.*
*शेतीला कामगार मिळणे आता मुख्य समस्या आहे.*
*कष्टाचे क्षेत्रात कामावर कोणीच येऊ इच्छित नाही.*
*शेतीवर मजुर मिळत नाही.*
*गायी गुरं राखायला कोणी हो म्हणत नाही.*
*शेताची राखण करणारे गायब झाले.*
*रात्री शेतावर मुक्कामाला तर मुळीच येत नाही.*
अडाणी अशिक्षित कामगार असला तरी मालकाला विचारतात, "काम कोणत आहे?"
*टाईम सकाळी सहा ते अकरा, नाहीतर सात ते बारा किंवा दहा ते तीन राहील. ही पहिली अट.*
*वावर लांब असेन तर येण्या- जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था करावी लागेल.*
*ही दुसरी अट.*
*पाच तासांच्या पारगीत दोन तीन वेळा लघवीला, एक वेळा संडासला, तीन वेळा पाणी पिणे, एक वेळा जेवण, चारपाच वेळा तंबाखु खाणे.*
सकाळी उशिरात उशीर करणे व सुटीच्या वेळी लवकरात लवकर सुटणे हे मालकाच्या जखमेवर मीठ टाकलं तरी बोलायचं नसतं.
😷
एखाद्या, वेळ लागली तर म्हणजे खूप उपकार केल्यासारखं धाक मोडायचा म्हणून हक्काचे दहापंधरा मिनिटे यात टोकायचं नाही. निंदणीला खाली, खुरपणी वर तोंडपट्टा चालू असतो, मग तण सुटले काय किंवा ठिबक नळी कापली गेली काय तो कामाचा एक भाग समजून बोलायचं नाही. एवढतेवढं चालायचच.
🤫
*प्रत्येक वेळी दहा मीनिटं व जेवायला तीस मीनिटं लागतातच. हा पायंडा पडलेला.*
एकावेळी सारे जणं मीळुन फक्त जेवायला बसतात.
बाकीचे विधी एकएकट्याने करतात.
तो विधी करायला गेला की बाकीचे हात आखडुन काम करतात, तो येई पर्यंत.
*मालकानं कामात चुक काढली किंवा त्यांच्या विधीबद्दल बोलला तर कीरकीर करणारा मालक आहे असे म्हणतात.*
काही तरुण कामगार तर कामावरुन या कीरकीरीच्या! कारणावरुन रागाने कामावरुन निघुन जातात. आणी सारे मिळून त्याचाही पगार मालकाकडून जबराईने घेतात,
*फक्त एक दिवस कामाला जाऊन नवरा बायको व मुलगा मुलगी असल्यास सारे मिळून हजार बाराशे रुपये कमवितात.*
*महिन्याला लागणारे गहू पंधरा किलो, किंमत तीस रुपये. तांदुळ पाच किलो, किंमत वीस रुपये. बाकी खर्च शेदोनशे रुपये.*
*सरकारी कंट्रोलच्या दुकानाची कृपा अव्याहतपणे खंबिरपणे पाठीशी आहेच.*
मजुराला बाकीचे दिवस कामाला गेले काय अन् न गेले काय काही फरक पडत नाही कुटुंब तर चालतंच.
मतपेटीवर डोळा ठेवून सर्व राजकीय पक्ष काम करतात.
विविध सरकारी योजना, अनुदान अंतर्गत देशाचा आर्थिक स्थितीचा विचार न करता लोकांना प्रभावित करण्यासाठी घरबसल्या विविध योजनांचा पैसा सरकारी सवंग योजनेद्वारे देतात. आणि ही मजूर मंडळी ग्रामपंचायत पासून ते तहसील कार्यालय व जिल्हा परिषद ते तलाठी कार्यालयात दिवसभर बैठक मारून बसतात.
त्या पैशामुळे काम करण्याची शक्तीचा विनाश झाला आहे.
*कोणतीही काम न करता कमी वेळात जास्त पैसा मिळवणे ही मानसिकता सरकारने समाजाची तयार केली आहे.*
सरकार हे राष्ट्रहिताची असणे गरजेचे असते परंतु ते सर्व सत्तापिपासु प्रवृत्तीकडे गेले आहे. देशावर जागतिक आर्थिक कर्जाचा प्रचंड बोजा वाढला आहे. त्यामुळे देश आर्थिक संकटाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. फक्त टाईमपास करणे व लोकांना आपल्याकडे वळून ठेवणे. याकरता विविध घोषणा व भ्रम लोकात निर्माण करून सत्ता मिळवली जाते.
लोकांचा लोकशाही वरील प्रचंड विश्वास उडालेला आहे. व
याला कारणीभूत सत्तापीपासू लोक आहेत. पैशाच्या जोरावर कोणतेही सरकार पाडणे व लोकशाही मार्गाने असलेले सरकार उद्ध्वस्त करणे. ही तर राष्ट्रहिताला व भारतीय घटनेच्या दृष्टीने अत्यंत बाधक घटना आहे. जो पर्यंत लोकांच्या डोक्यात देशहिताचा विचार येत नाही. तो पर्यंत या देशाची वाटचाल विनाशाकडे चालत राहील.
उच्चपदस्था पासून लोकशाहीचा खेळ खंडोबा करणे सुरू आहे. त्यांना भारतीय संविधानाची काही देणे घेणे दिसत नाही.
धर्मांधता व जातीव्यवस्थेवर देश चालवणे. म्हणजेच संपूर्ण मानवता नष्ट करणे होय.
*श्रमशक्तीचा नाश सरकारने केल्याने शेतकरी त्रस्त आहे.*
राज्याची, देशाची विनाशाकडे वाटचाल सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
😩
*एक मजुरामुळे त्रस्त शेतकरी 🌱*
23 likes
7 shares