#नवरात्र #शारदीय नवरात्र #जय अंबे नवरात्र उत्सव लवकरच #नवरात्र उत्सव लवकरच 🙏🔱🌹
पहिला दिवस – आई शैलपुत्री– नवरात्रीची सुरूवात देवी शैलपुत्रीच्या पूजेपासून होते. असं मानलं जातं की, या दिवशी देवीला तूप अर्पण केल्याने भक्तांना आनंद, सौभाग्य आणि आरोग्य लाभते.
दुसरा दिवस – आई ब्रम्हचारिणी– नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते. तिला साखर किंवा मिश्री अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे आयुष्य वाढते आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं.
तिसरा दिवस – आई चंद्रघंटा– नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा यांची पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला दुधापासून बनवलेल्या मिठाई, खीर किंवा बर्फी अर्पण केली जाते. यामुळे जीवनातील दु:ख आणि संकटे दूर होतात असं मानलं जातं.
चौथा दिवस – आई कुष्मांडा– नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा यांची पूजा केली जाते. या दिवशी तिला मालपुआ अर्पण करणे शुभ मानले जाते. याने भक्तांना बुद्धी आणि विवेकबुद्धी लाभते.
पाचवा दिवस – स्कंदमाता– नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने कुटुंबात शांती आणि आनंद मिळतो तसंच मुलांशी संबंधित चिंता दूर होतात.
सहावा दिवस – आई कात्यायनी– नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी देवीला मध अर्पण केल्याने समृद्धी आणि सन्मान मिळतो असे म्हटले जाते.
सातवा दिवस – आई कालरात्री– नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी गूळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण केल्याने भय आणि त्रास दूर होण्यास मदत होते.
आठवा दिवस – महागौरी– नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेली मिठाई अर्पण केल्याने आनंद, समृद्धी आणि सौभाग्य मिळते.
नववा दिवस – आई सिद्धीदात्री– नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला हलवा, पुरी आणि चणे अर्पण केल्याने वर्षभर यश आणि सिद्धी मिळते.
*🙏👣शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏👣*