#🤔एकनाथ शिंदें अचानक दिल्लीत दाखल🔴
मोठी बातमी! एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, महायुतीत नेमकं काय घडतंय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मध्यरात्री दिल्लीकडे कूच केली. त्यांच्या या दौऱ्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या ठाण्यासह मुंबईत भाजपसोबत शिंदे सेनेच्या कुरबुरी वाढल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्याला महत्त्व आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची नांदी आली आहे. त्याचवेळेस भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. त्यात शिंदे सेना आणि अजितदादांच्या जुन्या-जाणत्या लोकांचाही समावेश असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे नाराजी पसरली आहे. तर अनेक ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. ठाण्यासह इतर भागात दोन्ही पक्षात धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. निधी वाटपावरूनही सध्या नाराजी नाट्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात नेमके कोणत्या विषयावर चर्चा होणार हे अजून समोर आलेले नाही.
#📢25 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #चालू घडामोडी