17 सप्टेंबर '18 न्यूज
#

17 सप्टेंबर '18 न्यूज

192 जणांनी पाहिले
29 दिवसांपूर्वी
#

17 सप्टेंबर '18 न्यूज

🔴👉 'ॐ' कार "स्वरूपा". कोणत्याही व्याधीवर औषधोपचार ठरलेले असतात. पण व्याधी होऊच नये, मन प्रसन्न राहावे यासाठी ओमकाराचा जप नेहमीच फायदेशीर ठरतो. ॐकार आणि योग साधना याचे वर्णन पंतजली योग शास्त्र शांडील्य उप निषद, जावाला दर्शन उप निषद, योग चुडा मणी उप निषद अमृत नादोपनिषद इ. ग्रंथामध्ये पाहायला मिळते. ओंकार जप हा डोक्याच्या केसा पासून ते पायाच्या नखा पर्यंत अनुभवता येणारा मंत्र आहे. अकार उच्चाराने नाभी आसमंतात कंपन उत्पन्न होतात ज्या ठिकाणी ब्रह्मदेवतेची उत्पती झाली आहे. उकार उच्चाराने हृदय प्रदेशी आणि भोवताली कंपन जाणवतात कारण हृदय प्रदेशी विष्णू देवतेचे निवास स्थान आहे आणि मकार उच्चाराने मस्तिष्क प्रदेशी कंपन जाणवतात त्या ठिकाणी सहस्त्र पाकळ्यांनी असलेल्या कमावर भगवान शंकर विराजमान असतात असा हा त्रिगुणात्मक ओंकार स्वर्ग सुख देणारा असतो. ओंकाराच्या नियमीत अभ्यासाने शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात तयार होते ती ऊर्जा स्वतःला आणि समोर येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी तणाव मुक्त ठेवते. तणावामुळे निर्माण झालेल्या आजारामध्ये म्हणजेच निद्रानाश हिस्टेरिया स्मृतिनाश आळस नैराश्य थायरॉइड रक्तदाब पोटाच्या तक्रारी या आजारामध्ये सुंदर आणि सकारात्मक परिणाम झालेला पहायला मिळतो. ⭕ अनेक आजारांवर नियंत्रण. 👉 थायरॉईड मध्ये ओंकाराचा उच्चार फायद्याचा ठरतो. त्यामुळे गळ्यात कंपन निर्माण होतात. त्याचा सकारात्मक परिणाम थायरॉईड ग्रंथीकर होऊन तो आजार बरा व्हायला मदत होते. 👉 कशातच मन रमत नसेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन फक्त ओम् असा उच्चार करा. ताण तणाव वाढला असेल तरीही ओमकाराच्या उच्चारणाने फायदा होतो. शरीरातील टॉक्सिन्सही दूर होतात. 👉 नियमित ओम् उच्चार केल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहून हृदयही मजबूत राहाते. 👉 पचन क्रिया बिघडली असेल तर ती सुधारण्यासाठी ओमकाराचा उच्चार केल्याने फायदा होईल. यामुळे थकवाही घालवता येतो. 👉 मरगळ आणि आळस झटकून अंगात स्फूर्ती यायला हवी असेल तरीही ओमकार उच्चारल्यास शरीरात स्फूर्तीचा संचार होईल. 👉 बऱ्याच जणांना झोप नीट लागत नाही. मात्र ओमकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न लागण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्या पूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आकश्यक आहे. ⭕ असा करा ओमचा उच्चार. ओमचा  उच्चार करताना विशिष्ट स्थितीतच बसायला हवे असे नाही. मग डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्यायचा आणि नंतर ओम् असा उच्चार करत श्वास हळु हळू सोडायचा. ओमचे उच्चारण करताना शरीरात एक खास प्रकारचे कंपन निर्माण होईल. ते कंपन शरीरासाठी महत्त्वाचे असते. ओमचा  उच्चार करताना कान बंद करता आले तर जास्त फायदा होईल. ओ… म्हणताना श्वास आत घ्यायचा आणि म… म्हणताना तोच श्वास बाहेर सोडायचा. ⭕ महत्त्व अन् परिणाम. ओम् उच्चार केल्याने मन शुद्ध होते. मनावर आणि भावनांवर आपले नियंत्रण राहाते. म्हणूनच मनाची एकाग्रता, स्मरण शक्ती व बुद्धिमत्ता वाढकिण्यासाठी ओमचे उच्चारण महत्त्वाचे आहे. एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढवणेही ओमच्या सतत उच्चारणाने शक्य होते. आरोग्याच्या दृष्टीने पाहायचे तर शारीरिक आणि मानसिकरीत्या आराम वाटणे गरजेचे असते. ते ओमच्या उच्चाराने सहज शक्य होते. आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहायचे तर ओमकार जपामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात एक प्रकारचा तरंग निर्माण होतो. त्यामुळे वातावरण भारावून जाते. त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते.
692 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post