😱भारतीय क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू
5 Posts • 251K views
#😱भारतीय क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू. भारताचा माजी क्रिकेटपटू राजेश बानिक यांचा रस्ता अपघातात मृत्यू. ४० वर्षीय बनिक हे त्रिपुरातील आनंदनगर येथे अपघातग्रस्त झाले. आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारतीय महिला संघ, पहिल्या विश्वचषक विजेतेपदासाठी अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेच्या संघाविरूद्ध लढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सेमीफायनलमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भारतीय महिला संघ आता फायनल खेळासाठी मैदानात उतरली आहे. अशातच या आनंददायी क्षणी क्रिकेटविश्वातून एक दुख:द बातमी समोर येत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू राजेश बानिक यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. पश्चिम त्रिपुरातील आनंदनगर येथे ४० वर्षीय बानिक यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. राजेश इरफान पठाण आणि अंबाती रायुडूसारख्या खेळाडूंसोबत त्यांनी सामना खेळला आहे. तसेच बानिक त्रिपुराकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेतही खेळले होते. २०१८ साली त्यांनी आपला शेवटचा सामना खेळला होता. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुब्रत डे यांनी बानिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. #😱भारतीय क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू #📢2 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #भावपूर्ण श्रद्धांजली #ब्रेकिंग न्यूज
328 likes
8 comments 428 shares