📝माझं लिखाण
#

📝माझं लिखाण

■कधी कधी तुम्ही तुमच्या जीवनात निराश होता आणि जगात त्याच वेळी काही लोकं तुमच्या सारखंच जीवन जगण्याचं स्वप्न बघत असतात...☺☺ ■ घराजवळ शेतात उभा असलेला मुलगा आकाशात उडणाऱ्या विमानाला बघून त्याच्यासारख उंच उंच उडण्याचं स्वप्न बघत असतो. परंतु त्याच वेळी विमानातील पायलट शेताकडे आणि आणि उभ्या असलेल्या मुलाकडे पाहून लवकर घरी परतण्याच स्वप्न पहात असतो......... हेच खरं जीवन आहे .जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा आनंद घ्या..☺☺☺ ■जर धन-दौलत आणि रुपये-पैशे हेच जर आनंदी राहण्याचं गुपित असतं तर श्रीमंत लोक नाचताना दिसले असते. पण तस नसून फक्त गरीब मुलंच असं खेळून नाचून आनंद व्यक्त करताना दिसतात...☺☺☺ ■ जर पॉवर (शक्ती) मिळाल्याने सुरक्षित वाटत असते तर नेते मंडळी, अधिकारी हे लोक बिना सिक्युरिटीचे फिरताना पहायला मिळाले असते ..... पण जे लोक सामान्य जीवन जगतात ते सुखाने झोपी जाताना दिसतात.☺☺ ■ जर सौंदर्य आणि प्रसिद्धीमुळेे नाती मजबूत आणि घट्ट रहात असती तर सेलिब्रेटीज लोकांची लग्न सगळ्यांपेक्षा यशस्वी झाली असती पण तस न होता या लोकांचे घटस्फोट जास्त होतांना दिसतात ☺☺☺ ■म्हणून मित्रहो जीवनाचा आनंद घ्या, त्याचा भरपूर लाभ घ्या कारण जीवन एकदाच आहे परत नाही. सामान्य जीवन जगा, विनम्रता ठेवा आणि इमानदारीने जगा. स्वर्ग इथेच आहे ............... "जीवन एक प्रवास असून ते शिस्तीत आणि आरामात जगा. चढ-उतार तर येतच राहतील फक्त त्यानुसार स्वत:ला बदलत रहा. "प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा. त्याचप्रमाणे जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर जीवनात इच्छा कमी ठेवा ." कारण मातीची पकड हि घट्ट आणि मजबूत असते पण तेच संगमरवरी दगडावरून पाय घसरताना दिसतात. ☺☺☺ ■ जीवनाला एवढं सिरीयस घ्यायची गरज नाही कारण इथून जिवंत कोणी परत जाणार नाही. ज्याच्याजवळ फक्त नाण्यांचे सिक्के असतात ते आनंदाने पावसात भीजताना दिसतात आणि ज्यांच्या खिशात नोटा असतात ते कुठंतरी छताचा आधार घेताना दिसतात.☺☺ ■ पैसा माणसाला वरती घेऊन जाऊ शकतो पण माणूस वर जाताना पैसे घेऊन जाऊ शकत नाही. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 #📝माझं लिखाण
123 जणांनी पाहिले
12 तासांपूर्वी
#

📝माझं लिखाण

*मित्रानो 2 मिनिट वेळ काढून नक्की वाचा खूप सुंदर आहे* *मनात घर करुन जाईल* 👌👌👌👌👌👌👌👌👌एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही. एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला. खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो. त्याची नजर त्या भिका-याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले. हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो, "मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?" "साहेब" भिकारी म्हणतो, "माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा." तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो. त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या - येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापुढ्यात पैसे टाकू लागलाय. थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते. तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, "साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो." तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो. "वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी." भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात. आयुष्य कुणी जास्त जाणलं? या ओळी लिहीणा-या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे टाकणा-या लोकांनी? कि इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं? तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल... पण जर तुमची वाणी गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल... माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) २ वर्ष लागतात... पण "काय बोलावे?" हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते... ओढ म्हणजे काय? हे जीव लावल्याशिवाय कळत नाही... प्रेम म्हणजे काय? हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही... विरह म्हणजे काय? हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही... जिंकण म्हणजे काय? हे हरल्याशिवाय कळत नाही... दुःख म्हणजे काय? हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही... सुख म्हणजे काय? हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही... समाधान म्हणजे काय? हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही... मैत्री म्हणजे काय? हे ती केल्याशिवाय कळत नाही... आपली माणस कोण? हे संकटांशिवाय कळत नाही... सत्य म्हणजे काय? हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही... उत्तर म्हणजे काय? हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही... जबाबदारी म्हणजे काय? हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही... काळ म्हणजे काय? हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही... ❣❣❣❣❣❣❣❣ #📝माझं लिखाण
112 जणांनी पाहिले
12 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post