मोदक
#

मोदक

😍 _*उकडीचे मोदक*_😘 👉 *साहित्य* : 1 मोठा नारळ, किसलेला गूळ, 2 कप तांदूळाचे पिठ, वेलचीपूड, मिठ, तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप 👉 *कृती* : ▪ सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा.पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. ▪ आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहमी जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. 2 कप तांदूळ पिठासाठी 2 कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात 2 कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात 1 चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे, ढवळावे. मध्यम आचेवर 2-2 मिनीटे 2-3 वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून 5 मिनीटे झाकून ठेवावे. ▪ परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी. ▪ उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा. ▪ मोदकांना वाफवण्यासाठी चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात 3-4 भांडी पाणी उकळावे. चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले कि मिडीयम हाय गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला स्पर्शेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून 12-15 मिनीटे वाफ काढावी.....
1.8k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post