🙂Share a Smile
#

🙂Share a Smile

*उभ्या आयुष्यात पहिल्यांदा नवर्‍याच्या बाजुने आलेला लेख वाचला आणि तो ही एका स्त्री ने लिहिलेला.. मन भरुन आलं, पापण्या जडावल्या… प्राजक्ता गांधी परखडपणे लिहितात …मुलींनो,* *१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असतां तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही सात महिन्यानंतर कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.* *२. लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.* *३.आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.* *४. तुमची पाळी आल्यावर लगालगा तो तुमच्या उशापायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला (कदाचित) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.* करा५. नव-याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमंतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.* *६. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.* *७. तुम्हाला तुमची प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे ना ? , त्याला काही त्रास नाही ना ? हे वेळोवेळी त्याचे आईवडील चेक करणारच.* *८. सासूसासरे नकोच असतील तर अनाथ मुलांशी लग्न करावं.* *९. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो फक्ता दहा मिनीटं आईशी बोलला कि तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.* *१०. आईबरोबरच वडिल,भाऊ,बहिण ,मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.* *११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इत्यादी बाबतीत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलांशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.* *१२. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ''मनातलं ओळखून दाखव बरं'' सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.* * आवडला असेल तर अभिमानाने शेअर कर .* 🙏🙏🙏🙏
4.5k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post