🏸 *वाढदिवस विशेष : सायना नेहवाल* *HappyBirthday* 🎂 जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरही अधिराज्य गाजवणाऱ्या भारताची फुलराणी, स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा आज 29वा वाढदिवस. 💫 सायना नेहवाल ही भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तिचा जन्म 17 मार्च 1990 रोजी हरयाणामध्ये झाला. पुलेला गोपीचंद हे तिचे बॅडमिंटनमधले प्रशिक्षक आहेत. जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी. ▪ ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी सायना नेहवाल ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. ▪ जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. ▪ इंडोनेशियन खुल्या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. ▪ सायनाला 2009-10 चा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ मिळाला. ▪ 2009 साली तिला क्रीडाक्षेत्रातला मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’, तर 2010 साली ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. ▪ 2016 साली तिला पद्म भूषण पुरस्कार बहाल करण्यात आला. ▪ सायना नेहवालने यंदाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटाचेही विजेतेपद पटकावले आहे.
#

🎂साइना नेहवाल बर्थडे

🎂साइना नेहवाल बर्थडे - HAPPY BIRTHDAY भारताची फुलराणी Paina O Nehwal 17 March 1990 - ShareChat
248 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
#

🎂साइना नेहवाल बर्थडे

259 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post