वर्षावाणी मुंबई
आजच्या ठळक घडामोडी याप्रमाणे :
गिरगावात आज
पुन्हा पुन्हा प्रचंड पाऊस,
लहान मुलांना पावसाची गाणी म्हणण्यास बंदी
आंब्याच्या वनात मोरांचा नाचण्यास नकार,
पायदुखीची केली
तक्रार
नवरा बायकोंची भजी करण्यावरून भांडणे
विकोपाला,
पावसात भिजायला आवडते म्हणणारे भटके प्रेमी
सर्दी खोकल्याने त्रस्त,
दवाखान्यात झाली प्रचंड गर्दी
छत्री दुकानदार यांच्या दुसऱ्या बंगल्याची वास्तुशांत जोरात,
एसी व्यापारी चिंतेत,
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं,नमस्कार
उघडा छत्री,चला नीट
पावसाचा आला अगदी वीट
चिंब भिजलेल्या बातम्यांसाठी
बातमीदार
श्रावण छत्रीवाले
चेरापुंजी उपशाखा
गिरगाव
😜😜😜😜😜
#🤣मीम्स लव्हर😍 #🤘टाईमपास😝 #😊Feeling happy #पावसाळा🕺☔💃स्पेशल