#

💃आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस🕺

💃 *आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस; जाणून घ्या महत्व 💁‍♂ दरवर्षी 29 एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (इ.स.1727-1810) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. 📍 युनेस्कोची एक सह संघटना असलेली आयटीआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था यांच आयोजन करतं. ही संस्था 1982 पासून हा दिवस साजरा करते. 🎯 *दिवसाचे महत्व:* जगभरात नृत्यकला साजरी करणे, नृत्यकलेने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धर्माच्या विविधतेच्या सीमा ओलांडून सर्वाना ‘नृत्या’च्या द्वारे एकत्र आणणे, आणि नृत्यकलेचे समाजातले स्थान उंचावणे हा मुख्य उद्देश या दिवसामागे आहे. 💫 *भारतीय नृत्यशैली:* नृत्य ही एक 64 कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. 🧐 *भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार:* ▪ *महाराष्ट्र* - लावणी, कोळी नृत्य ▪ *तामिळनाडू* - भरतनाट्यम ▪ *केरळ* - कथकली ▪ *आंध्र प्रदेश* - कुचीपुडी, कोल्लतम ▪ *पंजाब* - भांगडा, गिद्धा ▪ *गुजरात* - गरबा, रास ▪ *ओरिसा* - ओडिसी ▪ *जम्मू आणी काश्मीर* - रौफ ▪ *आसाम* - बिहू, जुमर नाच ▪ *उत्तरखंड* - गर्वाली ▪ *मध्य प्रदेश* - कर्मा, चार्कुला ▪ *मेघालय* - लाहो ▪ *कर्नाटक* - यक्षगान, हत्तारी ▪ *मिझोरम* - खान्तुंम ▪ *गोवा* - मंडो ▪ *मणिपूर* - मणिपुरी ▪ *अरुणाचल प्रदेश* - बार्दो छम ▪ *झारखंड* - कर्मा ▪ *छत्तीसगढ* - पंथी ▪ *राजस्थान* - घूमर ▪ *पश्चिम बंगाल* - गंभीरा ▪ *उत्तर प्रदेश* - कथक
175 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

💃आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस🕺

179 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post