मुलगा -: असेल ही तस तुझ्यासमोर ती काहीच नाही ... मुलगी -: मला अश्या आहे की तुम्ही शेवट पर्यंत एकत्र आणि खूष राहाल ...कारण आपण शेवट पर्यंत एकत्र राहिलो नाही .. मुलगा -: i hope आम्ही राहू ... पण आपल नात का नाही टिकल...?? का शेवट पर्यंत नाही पहोचू शेकल ... मुलगी -:(रडत रडत ) well ...तू झोप आता ...खूप उशीर झाला ... मुलगा -: हा झोपतो काळजी घेत जा तुझी आणि त्याची .... मुलगी -: bay बाय ..मी तुला सांगितल ना झोप म्हणून ...उगच डोक्यात जाऊ नको .... मुलगा -: बर ...(मनातल्या मनात )कधीच विसरू शकत नाही तुला ...Miss u... आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते ... Tip-: आयुष्यात खूप वक्ती येतात जातात ... पण काही माणसे अशी असतात ...ती कायम लक्षात राहतात ....त्यांची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही .... मग आयुषयात कितीही कोणी येऊ त्या ती spcl च राहते ... 🎸🎸
#

रुद्राच्या लेखणीतून

रुद्राच्या लेखणीतून - प्रेमात पडायला मन लागत पण कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करत राहण्याला मनाचा मोठेपणा लागतो . . instagram @ the . marathi . world Facebook the . marathi . world - ShareChat
242 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
¶¶ मैत्री करताना काही सिमा असाव्यात का?💓 त्यातल्या स्थित्यतंरांची शोध घेतोय.. अर्थाचे गैरअर्थ करणारी त्याच प्रकारे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याकरीता एकत्र आलेली दोन लोकं जेव्हा त्यांच्यातल्या मैत्रीला वेगळ्याच भावनेचा अर्थ लावत असतील तर त्यातील प्रत्येकांस मैत्री नामक जिन्नस नेमका व योग्यपणे समजलाय का असा प्रश्न पडतो.. मैत्री ही केवळ एक भावना नसून विश्वास असते, जिला केवळ नाते असे नाव देताच येणार नाही.. आज कालची मैत्री- बहुधा काही मित्र मैत्रिणी असे ही असतात जे पुढील काळात बहीण भाऊ होतात. आपसांतील वर्तणूकीचा स्वत:ला लागलेला अर्थ मैत्रीवर थोपवणारी अशी frnds नावाची सर्कलं नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात कुणास ठाऊक?? आपल्या मित्रांची वर्तणूक आपणांस पटत नसेल वा त्यांचा अति सलगीपणा रुचत नसेल तर तुम्ही त्याच्याशी स्पष्टपणे चर्चा करा.. विषय संपवा. यामूळे गुंतागुंत अथवा गैरसमज निर्माण होत नाहीत. पण काहीक मंडळी, असे काही वाटलेस मैत्रीस बहीण-भाऊ, काका, मामा न जाणो अशा कित्येक नात्यांची नवी झालर चढवून मोकळे होतात. यामूळे आत्मिक समाधान इतकेच की त्या व्यक्तींपासून आता मला इनसेक्युअर वाटणार नाही. पण त्यावेळी त्या मित्रांमध्ये असेही काही मित्र असू शकतील ज्यांच्या मनात तुमच्याविषयीची भावना केवळ एक मित्र वा केवळ एक मैत्रीणच असेल.. अशावेळी तुम्ही त्यांच्या वर लादलेले हे अस्वाभाविक नाते त्यांच्या मनात तुमच्याविषयी नकारात्मक छबी निर्माण करु लागते याचाही विचार केला पाहीजे. तद्नंतर तो मित्र, ती मैत्रीण, ते मित्र पुर्ववत रहात नाहीत. मैत्री मधून इतर नात्यात गोवले गेलेले मित्र पुढील काळात निर्मळ मनाने एकत्र य़ेऊ शकत नाहीत. त्यामूळे मैत्री करत असताना विचार करा... केल्यानंतर विचार करु नका.. शेवटपर्यत एक मित्र म्हणून रहायचे की इतर कोणी याचा विचार तुम्ही कराच पण पुढील व्यक्तीवर आपले नाते लादू नका.. आपल्या मित्रांच्या भावनांचा, त्यांच्या आपल्याविषयीच्या भावनिकतेचा विचार करा. Friends Forever.. हे बोलण्यातून नव्हे तर आपल्या वर्तणूकीतून दर्शवून द्या.. आपल्या मित्रांत असणारी मैत्री आदर्श बनवा.. निर्मळ बनवा... अतुट बनवा.. 🙏✒️✍️
#

रुद्राच्या लेखणीतून

रुद्राच्या लेखणीतून - GOWIND PATIL PHOTOGRAPHY - ShareChat
222 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचाविचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं, सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो? अगं, मी अशी काही कारणं सांगू शकतनाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की. अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे? प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो. सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पणमला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती काआवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत? ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो. मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस. तुझा आवाज सुंदर आहे. तू अतिशय काळजी घेणारी आहेस. तू अतिशय प्रेमळ आहेस तू विचारी आहेस. तुझे हास्य मोहक आहे. तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते. प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा. तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करतहोतो. पण आता तू बोलू शकतेस का? नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो. पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रमदाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही. खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते? नाही. नक्कीच नाही. म्हणूनच.... मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय. थोडक्यात या गोष्टीचे निष्कर्ष असे. खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना. प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत. बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मीप्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे. तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषासांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता. आणि शेवटी.... ज्यांचा देवावर विश्वास असतो, तेभूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात ते त्याच्या समोर असतात.........!!! 🙏✒$️✍️
#

रुद्राच्या लेखणीतून

रुद्राच्या लेखणीतून - ShareChat
176 जणांनी पाहिले
12 महिन्यांपूर्वी
अविस्मरणीय संध्याकाळ.....खरच मनापासून प्रेम करणाऱ्यांनी हे क्षण नक्कीच अनुभवले असणार....... "अरे ....#...# एक सांगू का?" हसू नकोस हा.. मी हसत हसत म्हणालो "हा सांग... नाही हसत.." "अरे! काल कि नाही तू माझ्या स्वप्नात आला होतास..." मी .. "हो का ! ....."मग कायं केलं मी येऊन हां..हां ."? डोळ्यात लाजरेपणा दिसला .. "छे! पुरे आता तुझा चावटपणा.. तू फक्त आला होतास आणि मग गेलास.. " " ऑय्येंग ! मी आलो... नि गेलो!! .. असं होऊच शकत नाही ... मी आलो तर नकीच काहीतरी romantic करून गेलो असेन." “हाहाहा “ "हसतेस काय? .. खरचं.. !" ती - "अरे वेडू मग सांग न तूच तू काय केलंस ते.." असं होय मग ऐकच.. हो ऐकतेय .. व्हा सुरु.. थांब मीच सांगतो मी काय केल ते .. शांत संध्याकाळ झाली होती.. थंड वारा सुटला होता... सगळं कसं शांत...निःशब्द.. कदाचित ती संध्याकाळ आपलीच वाट पाहत होती .. आपण भेटण्याची ..मी आलो .. तुझ्या जवळ .. तुझं ते स्मितहास्य...लुकलुकणारे डोळे.. थरथरणारे ओठ.. आणि थोडीशी कुडकुडणारी तू... तुझ्या डोळ्यात पाहिलं आणि पहातच राहिलो .. बराच वेळ मी हरवूनच गेलो होतो.. तुझ्या डोळ्यात ... आपण बसलेल्या झाडाखाली.. पानांची सळसळ कानावर ऐकू पडत होती.. तुझा हात हातात घेतला... तु ही तो घट्ट धरलास मी तुला कधीच न सोडून जाण्यासाठी ... तू मधेच हसायला लागलीस.. माझं तसं रूप पाहून.. आणि नकळत म्हणालीस... "असं काय रे बघतोस..? आज मी काय वेगळी दिसते आहे का? " मी म्हणालो - "तू रोज वेगळी दिसतेस मला.. डोळेभरून पाहतच राहवसं वाटत " तू थोडंस चिडून – “ पुरे नको करू बनवाबनवी.. !” मी हलकेच तुझ्या केसातून हात फिरवला.. तु ही बेधुंद होऊन डोळे मिटून घेतलेस..नंतर माझे हात तुझ्या गाली लावून...बराच वेळ तू माझ्यकडे पहात राहिलीस.. जवळ आलो तुझ्या मी..खूप.. एकमेकांचे श्वास ऐकू यायला लागले..होते ..हृदयाची धडधड हळू हळू वाढत होती .. हाताचा घट्टपणा अजून घट्ट होत चालला होता...त्यात थंड वार्याची एक झुळूक येऊन हळूच तुझे केस माझ्या चेहऱ्यावर उडवून गेली .... आणि नकळत माझे डोळे मिटून गेले.... ऐकता ऐकता .. ती हरवून गेली.. नि मधेच उदास स्वरात म्हणाली.. “#.......#! बरं झालं हा ...हे स्वप्नच होतं..ते ” माझा चेहरा लगेच पडला... म्हणजे.. ती खरच आपल्यावर प्रेम नाही करत .. असं वाटलं.. मी काही म्हणायच्या आत तिने सारं ओळखलं होतं "#........#I luv u रे..... किती छान बोलतोस रे तू ?... खरंच अस घडेल का रे कधी? ... स्वप्नात नाही तर सत्यात तरी कधी? तू माझं होशील का ..?" मी - "मी तुझाच आहे गं.." फक्त तुला ते उशिरा कळतंय ... तिच्या स्वप्नात येऊन मी सर्वस्वी तिचा झालो.. प्रत्यक्षात तिचा होण्याआधी … भावनेनी व्याकूळ दोघे..एकमेकांच्या घट्ट मिठीत अडकलो.. अन अशी एक संध्याकाळ अविस्मरणीय ठरली..... तुझाच 🎸
#

रुद्राच्या लेखणीतून

रुद्राच्या लेखणीतून - HRUTA1209 _ CUTULI - ShareChat
207 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
💕मी 🏡घराच्या बालकनीत उभा राहुन रोज 🌹तिला पाहतो..❣️ ती 🏥खिडकीत येऊन 🙋ओल्या केसांना सुकवत उभी असते..💃💃 💕वा-याची एक झुळुक तीच्या💆 केसाच्या बटाला वा-यावर 🌹झुलवत असते..❣️ आणी हा क्षण मला तिच्याकडे आर्कषीत करत असतो..💃💃 💕माझ्या ह्रदयात तिच्यासाठी असलेल्या 🖤भावनांना तो तो 🌹जन्म देत असतो..❣️ मला तिला 💃पाहण्याचा एकही क्षण गमावासा वाटत नाही..💃💃 💕तिला पाहत असताना मला माझी 👀पापणी ही खाली झुकवायशी वाटत नाही..❣️ इतकी ❤️सुंदर आहे ती की मला तिच्याशिवाय 🌹दुसर काहीचं बघावसं वाटत नाही..💃💃 💕माहीती आहे मला आम्ही दोघ ऐकमेकांसाठी नाही आहोत..❣️ पण तिला 🌹मिळवण माझं 💗प्रेम कालही नव्हत, आणी आजही नाही..💃💃 💕प्रेमा सारखी सुंदर भावना तिच्यामुळे माझ्या 💓ह्रदयात स्पर्श करते यातच माझ 🌹समाधान आहे..💃💃 💕आणी या क्षणांसाठी मी तिचा नेहमी ऋणी राहील हे मला तीला एकदा सांगायच आहे..❣️ फक्त भिती वाटते तिच्या 🌹सुंदर नितळ 🖤पाण्यासारख्या 👀 डोळ्यांत पाहुन भावना व्यक्त करण्याची...! ❤️💲🙏✍️
#

रुद्राच्या लेखणीतून

रुद्राच्या लेखणीतून - ShareChat
205 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post