#

माहिती

🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦 *___________________________* 💫 *_M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞    _*   💫 🇮_*⭕ वंशावळीच्या नोंदीतून इतिहासाचे जतन, तुळजापुरातील पुजार्यांकडे शेकडो वर्षांचे ‘बाड’ ⭕*_🇮 ```🔅अनेक राजे-महाराजे आणि राजकीय नेते यांच्या वंशावळी तुळजापूरच्या पुजार्यांकडे आजही पाहायला मिळतात.``` ____________________________ *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_* *╰──────•◈•──────╯* ____________________________ . 📯 *_दि. ११ आॅक्टोबर २०१८_* 📯 . *_पुजारी आणि भाविक यांच्यातील व्यवहार अव्याहतपणे पिढ्यान्पिढ्या सुरु राहावा या उद्देशाने तुळजापूरच्या पुजार्यांनी लिहून ठेवलेले ‘बाड’ अर्थात वंशावळीच्या नोंदीने अनाहूतपणे अनेकांच्या कित्येक पिढ्यांच्या इतिहासाचे जतन केले आहे. म्हणूनच अनेक राजे-महाराजे आणि राजकीय नेते यांच्या वंशावळी तुळजापूरच्या पुजार्यांकडे आजही पाहायला मिळतात. पूर्वीच्या वंशावळी या मोडी लिपी आणि उर्दूत भाषेत असायच्या. आता त्या मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिल्या जात आहेत._* *_..............................................._* ╔══╗ ║██║ _*M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞    *      _  ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █ *- - - - - - - - - - - -●* _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_ https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439 ____________________________ तुळजाभवानी देवी मंदिरात भाविकांना आपला परंपरागत पुजारी ओळखता यावा यासाठी भाविकांच्या पूर्ण नोंदी ठेवण्याची पद्धत शेकडो वर्षांपासून पुजार्यांनी सुरु ठेवली आहे. या नोंदी ज्या वहीत ठेवल्या जातात, त्या नोंदवहीला बाड किंवा वंशावळ म्हटले जाते. या ऐतिहासिक दस्तऐवजास उच्च न्यायालयाने सुद्धा कायदेशीर दस्तऐवज म्हणून मान्यता दिली आहे. याच्याच आधारावर आजमितीस अनेकजण तुळजाभवानी मंदिरात पुजार्याचा अधिकार बजावत आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, बुधवारी घटस्थापनेने तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरु झाला. नऊ दिवस चालणार्या या उत्सवात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या येणार्या भाविकांचा पुजारी ठरलेला असतो. येथील पुजार्यांच्या वंशावळीत अनेक राजे-महाराजे आणि राजकीय नेत्यांच्या वंशावळी याठिकाणी उपलब्ध आहेत. बाड अर्थात वंशावळ लिहिण्याचे काम आजही तुळजापुरात सुरु आहे. शेकडो वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या पुजार्यांकडेच भाविक मुक्कामाला उतरतात. त्याच ठिकाणी भाविकांची भोजन व्यवस्था पुजार्यांकडून केली जाते. देवीचा नैवैद्य तयार करून दिला जातो. विशेष म्हणजे मांसाहारी व शाकाहारी भाविकांसाठी वेगवेगळी व्यवस्था या पुजार्यांकडून केली जाते. पूर्वीच्या वंशावळी या मोडीलिपी आणि उर्दू भाषेत लिहिल्या जात. काळाप्रमाणे त्यात बदल होवून आता मराठी आणि इंग्रजीमधून लिहिल्या जात आहेत. एखाद्या कुटुंबात संपत्तीचा वाद सुरु झाला तर या वंशावळीचा आधार आजही घेतला जातो. उच्च न्यायालयाने देखील या नोंदींना कायदेशीर मान्यता दिली असल्याचे समोर आले आहे. 🇮 *_⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾_*🇮 ____________________________ *🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞* ┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓ _*🇮माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🇮*_ ┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛ *.............................................* . _*ണคн¡т¡ รεvค*_ . *_:::::∴━━━✿━━━∴::::_* . *_⊱•-------•⊰🍁⊱•-------•⊰_*
4k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

माहिती

📙 *भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो' चे कार्य काय ?* 📙 *********************************** आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्षेत्रांमध्ये सध्या संशोधन सुरू आहे. जगाच्या बरोबरीने भारताची वाटचाल ज्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र म्हणजे अंतराळ. चंद्रावर २००८ साली 'मून इम्पॅक्ट प्रोब' तर २०१४ साली पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे मंगळावर 'मंगळयान' पाठविणारा पहिला देश ठरण्यात भारत यशस्वी झालेला आहे. सन १९६२ मध्ये स्थापन झालेल्या 'भारतीय अंतराळ संशोधन संस्था' अर्थात 'Indian Space Reasearch organisation' (इस्रो) या संस्थेचे प्रमुख प्रवर्तक डॉक्टर विक्रम साराभाई होते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट उपग्रह आणि अग्निबाण यांची निर्मिती करणे, उपग्रह वाहकांची तसेच प्रक्षेपकांची निर्मिती करणे हे आहे. त्रिवेंद्रम जवळील थुंबा येथे भारताचे पहिले अग्निबाण प्रक्षेपण स्थळ कार्यान्वित झाले. भारताने १४ एप्रिल १९७५ रोजी रशियाच्या भूमीतून 'आर्यभट्ट' हा तीनशे साठ किलो वजनाचा पहिला उपग्रह अंतराळात सोडला आणि अंतराळयुगास प्रारंभ केला. 'भास्कर १' हा प्रायोगिक स्वरूपाचा उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ७ जानेवारी १९७९ रोजी अंतराळात सोडण्यात आला. दूरदर्शनचे कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून 'इन्सॅट १ए' उपग्रह १० एप्रिल १९८२ रोजी अंतराळात सोडण्यात आला. पण सप्टेंबर १९८२ मध्येच तो निकामी झाला. त्यानंतर 'इन्सॅट १बी', 'इन्सॅट १सी', आयआरएनएसएस इत्यादी उपग्रह सोडण्यात आलेले आहेत. चंद्र आणि मंगळ भारतीयांच्या कवेत आलेलाच आहे आता फक्त वेध आहेत इतर ग्रह ताऱ्यांचे. त्यासाठी इस्त्रो विविध मोहिमांमध्ये गुंतलेली आहे. भूस्थिर उपग्रह पाठवणे किंवा इतर ग्रहांकडे यान पाठवण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची कमतरता भरून काढण्यासाठी LVM3 या अंतराळ वाहकाच्या मोहिमेमध्ये इस्रोचे वैज्ञानिक सध्या गुंतलेले आहेत. रशियाच्या मदतीने २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा हा अंतराळात जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर ठरला. त्याच्या बरोबर दोन रशियन अंतराळवीर सुद्धा होते. अंतराळयान भारतावरून जात असताना त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांचे बरोबर संपर्क साधला आणि विचारणा केली की 'आपको भारत कैसा दिखता है ?' त्यावेळी राकेश शर्मा यांचे उद्गार होते, 'सारे जहाँ से अच्छा'. आज प्रांतवाद, धर्मवाद, जमातवादाची भाषा करणारी, दंगलीच्या माध्यमातून माणसा माणसांतील अंतर वाढवणारी, संघटित आणि प्रस्थापित झालेली व्यक्तिमत्त्वे, आपण सर्व भारतीय म्हणून विचार करणार आहेत की नाही ? हा मुख्य मुद्दा आहे. भारतीय वंशाची परंतु अमेरिकेची नागरिक असलेली कल्पना चावला २००३ मध्ये नासाच्या मदतीने अंतराळात गेली. परंतु १ फेब्रुवारी २००३ मध्ये कोलंबिया यानातून पृथ्वीवर परत येत असताना दुर्घटना घडली. कल्पना चावलासहीत सात अंतराळवीर मृत्युमुखी पडले. अंतराळात जाणे जीवावर सुद्धा बेतू शकते याची प्रचिती या निमित्ताने आली. अमेरिकेने सर्व अंतराळवीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशनींना नाव दिलेली आहेत. त्यातीलच एका अशनीचे नाव आहे 'अशनी ५१८२ कल्पना चावला'. भारत सरकारने हवामान संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहाला 'कल्पना १' आणि 'कल्पना २' ही नावे देऊन तिचा उचित सन्मान केला आहे. दिनांक ९ डिसेंबर, २००६ मध्ये भारतीय वंशाची परंतु अमेरिकेच्या नागरिक असलेल्या सुनीता विल्यम्सने अंतराळात जाण्याचा मान पटकावला. अंतराळात जास्त काळ राहणारी (जवळपास १९५ दिवस), बोस्टन मॅरेथॉनमध्ये अंतराळातच भाग घेणारी, अंतराळात जास्त काळ चालणारी महिला, अशा विविध वैशिष्ट्यांनी तिला सन्मानित करण्यात आलेलं आहे. जलद शतक काढणारा, एका षटकात जास्त धावा काढणारा, जास्त धावा देणारा, जास्त षटकार मारणारा, जास्त शतके काढणारा, रटाळ खेळणारा, असल्याच वैशिष्ट्यांचा मारा प्रसार माध्यमांच्याद्वारे सहन करणाऱ्या भारतीय समाजाकडून सुनीता विल्यम्सची वैशिष्ट्ये उपेक्षित राहणे स्वाभाविकच आहे. पहिली भारतीय महिला अंतराळवीर म्हणून कल्पना चावलाचे नाव बहुतांश वेळेला घेतले जाते. पण कल्पना चावला अथवा सुनीता विल्यम्स या अमेरिकेच्या अंतराळवीर आहेत. कारण त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत. पहिली भारतीय महिला अंतराळवीर होण्याचा बहुमान अजून कोणीही पटकावलेला नाही. त्यामुळे शालेय अथवा महाविद्यालयीन युवतींना अजूनही संधी उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी साचेबद्ध शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडून संशोधनात्मक वृत्ती जोपासण्याची गरज आहे. स्थिर विश्वनिर्मितीच्या सिद्धांताचे १९९३ मध्ये फ्रेड हाॅएल, जेफरी बर्बीज आणि डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पुनरुज्जीवन केले आणि नवीन सिद्धांत मांडला 'स्थिरवत स्थितीचे विश्व' या नावाने. पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या 'आयुका' या संशोधन संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष असलेल्या डॉक्टर जयंत नारळीकर यांचे खगोल विज्ञानाच्या प्रसारामध्ये आणि संशोधनांमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे. 'चंद्रशेखर मर्यादा' किंवा Chandrashekhar Limit' या नावाने अजरामर झालेल्या अनिवासी भारतीय डॉक्टर एस चंद्रशेखर यांचेही योगदान खगोलविज्ञानामध्ये उल्लेखनीय आहे. श्वेतबटू ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पट झाले की तारे आकुंचन पावण्यास सुरुवात होते आणि शेवटी या ताऱ्याचे न्यूट्रॉन ताऱ्यांमध्ये अथवा कृष्णविवरामध्ये रूपांतर होते. यालाच चंद्रशेखर मर्यादा म्हणतात. या त्यांच्या संशोधनाला १९८३ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. अशा या भारतीय खगोल वैज्ञानिकांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर मात्र प्रामाणिकपणे इस्रोच्या टीममध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. *डाॅ. नितीन शिंदे* *'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून* https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/
130 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

माहिती

--------------------------------------------------- *घरातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट करण्यासाठी करा हे सोपे उपाय,* --------------------------------------------------- अनेकवेळा आपल्या अपयश आणि अडचणींचे कारण घरातील निगेटिव्ह एनर्जी असू शकते. अशा परिस्थितीमध्ये कितीही प्रयत्न केले तरी मनासारखे यश प्राप्त होत नाही. तुम्हालाही हीच समस्या असल्यास ज्योतिषचे काही सोपे उपाय तुमच्या कामी येऊ शकतात. येथे जाणून घ्या, हे उपाय... *१.* संध्याकाळी पूजा करताना घरात शंख अवश्य वाजवावा आणि शंखाने घरात पाणी शिंपडावे. दररोज घरामध्ये शंखाने पाणी शिंपडल्यास निगेटिव्हिटी नष्ट होते आणि दैवी शक्तींचा घरात वास राहतो. *२.* दररोज सकाळी एक वाटीभर पाणी सूर्यप्रकाशात ठेवावे. संध्याकाळी हे पाणी अशोक किंवा आंब्याच्या पानांनी संपूर्ण घरात शिंपडावे. या उपायाने घरातील सर्वप्रकाराची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन दुर्भाग्य दूर होते *३.* कुटुंबातील एखाद्या सदस्याला वारंवार वाईट स्वप्न पडत असल्यास झोपण्यापूर्वी कापूर तुपात मिसळून जाळावा. या उपायाने निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते आणि कुटुंबातील सर्व सदस्य शांत झोपू शकतील. *४.* रात्री झोपण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात खडेमीठ काचेच्या वाईट भरून ठेवावे. सकाळी हे मीठ एकत्र करून नदीमध्ये प्रवाहित करावे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते. *५.* घरातील नकारात्मक उर्जा नष्ट करण्यासाठी घरामध्ये दररोज ५ पवित्र वस्तूंचा धूर करावा. *या पाच वस्तू कापूर, शुद्ध तूप, चंदन, लोबान (उद), गुगुळ आहेत. गाईच्या शेणापासून तयार केलेली गौरी जाळून त्यावर या पाच वस्तू टाका.* त्यानंतर यामधून निघालेला धूर घरामध्ये थोडावेळ पसरू द्या. या पाचही वस्तू पवित्र मानण्यात आल्या असून यामधून निघणारा धूर घरातील वातावरण पवित्र करतो. सूक्ष्म किटाणू नष्ट होतात आणि वास्तुदोष समाप्त होतो. सकारात्मक उर्जा वाढते. या पाचही वस्तू बाजारात सहजपणे मिळतात. *६.* घरामध्ये खडेमीठ ठेवा - जर एखाद्या घरात अनेक वास्तुदोष असतील आणि हे दोष दूर दूर करणे शक्य होत नसेल तर बाथरूममध्ये एक वाटीभर खडे मीठ ठेवा. हा उपाय केल्यास घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतील आणि सकारत्मक उर्जा निर्माण होईल. प्रत्येक महिन्यात वाटीतील मीठ बदलून घ्या. जुने मीठ फेकून द्या. *७.* गोमुत्राने दूर होतात विविध दोष - नियमितपणे घरामध्ये गोमुत्र शिंपडल्यास घरातील वास्तुदोष कमी होऊ शकतात. वास्तूदोषामुळे निर्माण होत असलेल्या अडचणी दूर होतात. घराच्या जवळपास नकारात्मक उर्जा सक्रिय असेल तर ती निष्क्रिय होते. घरातील वातावरणात उपस्थित असलेले विविध प्रकारचे हानिकारक सूक्ष्म किटाणू गोमुत्राच्या प्रभावाने नष्ट होतात. गोमुत्रामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यदायी लाभ प्राप्त होतात. --------------------------------------------------------------- *घर आणि ऑफिसमध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तूत बरेच उपाय सांगण्यात आले आहेत.* ----------------------------------------------------------- *या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जेला दूर करून वातावरणाला सकारात्मक बनवू शकता.* *वस्तूनुसार पूर्व आणि उत्तर दिशा जास्त ऊर्जावान दिशा आहेत. या दिशांमुळे स्वास्थ्य, समृद्धी आणि रचनात्मक शक्तीचा विकास होतो. लाकडापासून तयार वस्तूंना घर किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेत ठेवणे शुभ असत.* -------------------------------------------------- *येथे आपण जाणून घेऊ वास्तूचे काही अजून उपाय....* ------------------------------------------------- *१.* जर तुम्ही घर, ऑफिस किंवा शो-रूमच्या पूर्वी भागात लाकडाचे फर्निचर किंवा लाकडापासून बनलेल्या वस्तू जसे अलमारी, शो पीस, झाड किंवा लाकडाच्या फ्रेमशी निगडित फोटो लावले तर सकारात्मक लाभ मिळू शकतो. *२.* घर, दुकान किंवा ऑफिसमध्ये सुख शांतीचे वातावरण हवे असेल तर या दिशांमध्ये रोप किंवा लाकडाच्या वस्तू ठेवायला पाहिजे. *३.* मानसिक ताणापासून बचाव करण्यासाठी चंदनाची उदबत्ती लावायला पाहिजे. याने ताण कमी होण्यास मदत मिळेल. ----------------------------------------------------
176 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

माहिती

*🔹मागे वळुन पाहताना 🔹* *२८ सप्टेंबर २०१७ ची माहिती सेवाची फेसबुक पोस्ट* _____________ *⭕ कपडे धुण्याचं @नो टेंशन , 100 दिवस न मळणारा👔 शर्ट तयार ⭕* 👔👔👔👔👔👔👔👔👔👔👔 ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' *_우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우_* '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' https://youtu.be/O_KY6uxKEZ8 *_🌷 तारीख 28 सप्टेंबर 2017 🌷_* ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻'''''''''''''''''''''''''''''''''''''''''' कपडे धुण्याचा खूप@ जणांना कंटाळा असतो . त्यामुळे खुप लोक असेच न धुतलेले कपडे वापरतात .@ त्यांच्यासाठी खुशखबर आली आहे . @अमेरिकन कंपनी ‘वुल अँड प्रिन्स’ ने असा न चुरगळणारा, अति व्यायाम केल्यानंतरही घामाचा वास न लागणारा, सतत ‘फ्रेश’ दिसणारा आणि 100 दिवस दररोज वापरूनही स्वच्छ दिसणारा शर्ट त्यांनी तयार केला आहे. @ ͜M͜a͜h͜i͜t͜i͜ ͜s͜e͜v͜a͜ ͜g͜r͜o͜u͜p͜ ͜p͜e͜t͜h͜v͜a͜d͜g͜a͜o͜n͜ हा शर्ट इस्त्री न करताही कडक राहू शकतो . तसेच हा शर्ट तयार करण्यासाठी वुलन ब्लेंडचा वापर केला आहे @. हा शर्ट सतत ताजा राहतो आणि हे त्यांनीही सांगितलं आहे ज्यांना या शर्टच्या चाचणीसाठी नेमलं होत. @ *_✍🏼संकलन_* https://youtu.be/O_KY6uxKEZ8 *_९८ ९० ८७ ५४ ९८_* *_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_* 🐅 *माहिती सेवा ग्रुप, पेठवड़गाव* 🐅 *_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_*
127 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

माहिती

*🔹मागे वळुन पाहताना 🔹* *२५ सप्टेंबर २०१६ ची माहिती सेवाची फेसबुक पोस्ट* _____________ ♍ *मत्स्यतेलामुळे सैनिकांचा मूड सुधारण्यास मदत* ♍माहिती सेवा गृप पेठवड़गाव युद्धक्षेत्रातून परतलेल्या सैनिकांमध्ये शारीरिक श्रमांचा अभाव आणि रक्तात मत्स्यतेलाचे (फिश ऑइल) घटलेले प्रमाण यामुळे नैराश्याची भावना घर करू लागते. मत्स्यतेलाचे सेवन वाढवल्यास सैनिकांचा मूड चांगला राहण्यास मदत होते, असे नव्या संशोधनात आढळून आले आहे.♍🐠🐟🐠🐟🐠अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीतील संशोधक रिचर्ड क्रिडर आणि मेजर निकोलस बॅरिंजर यांनी १०० सैनिकांवर अभ्यास करून हे निष्कर्ष काढले. त्यानुसार शारीरिक श्रम, रक्तातील फिश ऑइल आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचे प्रमाण मूड ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचे प्रमाण कमी झाल्यास माणूस निराश होतो. तर ते योग्य असल्यास उत्साही व प्रसन्न राहतो. सामान्य नागरिकांच्या तुलनेत सैनिकांना त्याची अधिक गरज भासते. कारण त्यांचे शारीरिक श्रम अधिक होतात. तसेच युद्धजन्य परिस्थितीत मनावर अधिक आघात होतात. ते भरून येण्यासाठी आणि मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी फिश ऑइल आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स महत्त्वाची भूमिका बजावतात.♍ 🐠🐟🐠🐟🐠🐟 ______
144 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
*___________________________* 💫 _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _ 💫 _*⭕ ‘ह्या’ गोष्टी सिद्ध करतात की प्राचीन विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते ⭕*_ ____________________________ . *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_* *╰──────•◈•──────╯* ____________________________ . 📯 *_दि. २४ सप्टेंबर २०१८_* 📯 *_प्राचीन काळी नजर टाकली तर असे दिसून येते त्या काळचे विज्ञान, वेद-शास्त्र हे आजपेक्षा अधिक प्रगत होते.मानवाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे शोध आज लावले ते प्राचीन काळी भारतातील ऋषी-मुनींनी तेव्हाच लावल्याचे अनेक उल्लेख पौराणिक लेखांत सापडतात._* असेच काही वैज्ञानिक शोधांबद्दल जाणून घेणार आहोत जे भलेही आज विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या नावे असतील पण त्याचा उल्लेख प्राचीन काळात देखील सापडतो. *🌞सूर्यमंडळ :* सूर्यमंडळ, ज्याचा वैज्ञानिकांनी खूप काळा नंतर शोध लावला. पण याची माहिती आपल्याला ऋग्वेदात सापडते. ऋग्वेदनुसार ‘सूर्य आपल्या कक्षेत फिरतो आणि फिरताना पृथ्वी तसेच इतर ग्रहांची ऐकमेकांशी टक्कर होणार नाही याप्रकारे त्यांच्यात संतुलन बनवून ठेवतो.’ ╔══╗ ║██║ _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _  ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █ *- - - - - - - - - - - -●* _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_ https://m.facebook.com/story.php?story_fbid=596664530731474&id=100011637976439 ____________________________ *💤गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत :* गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची माहिती देखील आपल्याला ऋग्वेदात सापडते. ऋग्वेदानुसार, ‘पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यासोबतच त्यावर असणारे व्यक्ती देखील त्यानुसार फिरतात, तसेच ती सूर्याभोवती देखील फिरते.’ *पृथ्वी आणि सूर्या 🌎+🌞मधील अंतर :* पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराबाबत हनुमान चालीसामध्ये सांगण्यात आले आहे. हनुमान चाळीसच्या एका श्लोकात सांगण्यात आले आहे की, *“जुग सहस्त्र जोजन पर भानू, लील्यो ताहि मधुर फल जानू”* या श्लोकचा अर्थ असा की, भानू म्हणजे सूर्य हा पृथ्वीपासून जुग सहस्त्र एवढ्या अंतरावर आहे. जेव्हा वैज्ञानिकांनी हे अंतर मोजले तेव्हा ते जवळपास एवढेच होते. १ जुग = १२००० वर्ष १ सहस्त्र जुग = १२०००००० वर्ष आणि १ योजन = जवळपास ८ मैल जुग सहस्त्र योजनचा अर्थ १२००० X १२०००००० X ८ = ९६०००००० मैल म्हणजेच किलोमीटरमध्ये, ९६०००००० X १.६ = १५३६००००० एवढा आहे. खरे अंतर १५२०००००० एवढे आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट *🌎पृथ्वीचा परीघ :* ७ व्या शतकात ब्रह्मगुप्त यांनी पृथ्वीबद्दल सांगितले होते की, पृथ्वीचा परीघ हा जवळपास ३६००० किलोमीटर एवढा आहे. जेव्हा वैज्ञानिकांनी गणना करून याला ४००७५ किलोमीटर असल्याचे सांगितले होते. या दोन आकड्यांमध्ये केवळ एक टक्क्याचा फरक होता. *💡प्रकाशाची गती :* एका प्राचीन वैज्ञानिकाने पुरातन काळातच प्रकाशाच्या गतीचा शोध लावला होता. त्यांनी सांगितले होते की, ‘सूर्य हा अर्ध्या निशेमध्ये २२०२ योजनपर्यंतचे अंतर कापतो’, एक योजन म्हणजे जवळपास ९ मैल आणि एक निमेश म्हणजे एका सेकंदाचा १६/७५ वा भाग. म्हणजेच, २२०२ योजन X ९ मैल X ७८/८ = १,८५,७९४ मैल प्रती सेकंद हा आहे. याची खरी मोजणी केल्यानंतर हे लक्षात आले की, त्याने सांगितलेले आकडे आणि मोजणी केलेले आकडे जवळपास बरोबरच आले होते. खऱ्या मोजणीमध्ये हे आकडे १,८६,२८२.३९७ प्रती सेकंद एवढे आले. *🏮एका वर्षाची लांबी :* सूर्याच्या सिद्धांतानुसार, वर्षाच्या लांबीच्या मोजमाप करण्यासाठीच्या चार पद्धती आहेत. त्यांची नावे नक्षत्र, सावना, चंद्र आणि सौर ही आहेत. सौर पद्धतीने वर्षाची अचूक लांबी ३६५ दिवस, ६ तास, १२ मिनिटे आणि ३० सेकंद एवढी दर्शवते. जर तुम्ही विचार करत असाल की, त्यांनी हे कसे ठरवले, तर तुम्ही कोणार्क आणि हम्पी येथिल मंदिरांना भेट देऊन याविषयी जाणून घेऊ शकता. येथे तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या योग्य अशा अविश्वसनीय वास्तुकला आढळतील. ᴍ̸ᵃ̸ʰ̸ⁱ̸ᵗ̸ⁱ̸ ̸ˢ̸ᵉ̸ᵛ̸ᵃ̸ ̸ᵍ̸ʳ̸ᵒ̸ᵘ̸ᵖ̸,̸ ̸ ̸ᴘ̸ᵉ̸ᵗ̸ʰ̸ᵛ̸ᵃ̸ᵈ̸ᵍ̸ᵃ̸ᵒ̸ⁿ̸ ̸ *🌎पृथ्वी गोलाकार आहे:* आर्यभट्टाने अशा एका सूत्राचा शोध लावला होता, ज्यावरून हे समजते की, आपली पृथ्वी ही एका अक्षावर फिरते. पीआयचे मूल्य ३.१४१६ असल्याचे यावरून समजते. आर्यभट्टाने सांगितले होते की, पृथ्वीचा परीघ हा ३९७३६ किलोमीटर एवढा आहे आणि तो खऱ्या मुल्याच्या फक्त १०० किलोमीटर कमी आहे. तसेच, आर्यभट्टाने हे देखील सांगितले होते की, पृथ्वी फक्त एकटीच फिरते बाकीचे तारे आणि सूर्य एका ठिकाणीच आहेत. अशी आणि यांसारख्या इतर काही उदाहरणांवरून हे समजते की, काही प्राचीन काळातील गोष्टी या विज्ञानाशी मिळत्याजुळत्या आहेत. आता ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत की छद्म विज्ञानाच्या – हा अनंतकाल चालू शकणारा वाद आहे. जो पर्यंत आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर ह्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तो पर्यंत खात्रीने काहीच म्हणणे उचित ठरणार नाही. ____________________________ *🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞* ┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓ _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ ┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛ *.............................................* . _*ണคн¡т¡ รεvค*_ . *_:::::∴━━━✿━━━∴::::_* . *ℰ⍲‿⍲ℰ*
#

माहिती

माहिती - ShareChat
130 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

माहिती

*🔹मागे वळुन पाहताना 🔹* *२ सप्टेंबर २०१७ ची माहिती सेवाची फेसबुक पोस्ट* _____________ *⭕ भारतातील एक गाव जेथे दरवर्षी@ पक्षी करतात आत्महत्या! ⭕* ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' *_우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우_* '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' https://youtu.be/O_KY6uxKEZ8 *_🌷 तारीख 21 सप्टेंबर 2017 🌷_* ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻'''''''''''''''''''''''''''''''''''''''''' आसाम राज्यात दिमा हसाओ जिल्ह्यात जातिंगा नावाच एक गाव आहे. येथील कछार नावाच्या दरीमध्ये स्वत:ला झोकून देऊन पक्षी सामुहिक आत्महत्या करतात, या विलक्षण गोष्टीमुळे हे गाव जगभरात चर्चेत आहे.@ पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात अनेक पक्षी येथे येतात, पण त्यातील अतिशय कमी पक्षी पुन्हा आपल्या घरट्यात परततात. एक गोष्ट मात्र आवर्जून विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यांच्या काळात अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत पक्षी उडायचे थांबतात.@ ͜M͜a͜h͜i͜t͜i͜ ͜s͜e͜v͜a͜ ͜g͜r͜o͜u͜p͜ ͜p͜e͜t͜h͜v͜a͜d͜g͜a͜o͜n͜ *ते स्वत:चे पंख फडकावत नाहीत आणि प्रकाशाच्या दिशेने स्वत:ला खाली झोकून देतात.@ जणू ते स्वत:वरचा ताबा हरवून बसतात आणि एखाद्या वस्तूला धडकून खाली पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो.* गेल्या १०० वर्षांपासून न चुकता दरवर्षी ही घटना घडते. या आत्महत्येमध्ये जवळपास ४४ जातीच्या चिमण्यांचा समावेश असतो. या घटनेचा शोधलावण्यासाठी सरकारने प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सेन गुप्ता यांना पाचारण केल होत. @त्यांनी केलेल्या निरीक्षणातून असा सिद्धांत मांडला की, जेव्हा धुकं पडत आणि हवा जोरात वाहते तेव्हा येथील प्रदेशाच्या चुंबकीय स्थितीमध्ये मोठा फरक पडतो. ͜M͜a͜h͜i͜t͜i͜ ͜s͜e͜v͜a͜ ͜g͜r͜o͜u͜p͜ ͜p͜e͜t͜h͜v͜a͜d͜g͜a͜o͜n͜ याच कारणामुळे पक्षी विचित्र वागतात आणि प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात.@ पण अजूनही न थांबलेल्या पक्ष्यांच्या आत्महत्येचं नेमकं कोड गुलदस्त्यातचं आहे ! *_✍🏼संकलन_* https://youtu.be/O_KY6uxKEZ8 *_९८ ९० ८७ ५४ ९८_* *_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_* 🐅 *माहिती सेवा ग्रुप, पेठवड़गाव* 🐅 *_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_* Ⓜ🅰♓ℹ🌴ℹ ⚡️📧✅🅰. ⛽️®⭕️⛎🅿️.
127 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

माहिती

*___________________________* 💫 _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _ 💫 _*⭕ नायजेरियामध्ये आहे मुले जन्माला घालण्याचा कारखाना ⭕*_ ____________________________ *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_* *╰──────•◈•──────╯* ____________________________ . 📯 *_दि. ४ सप्टेंबर २०१८_* 📯 . *_मुले जन्माला घालण्याचे अनेक कारखानेच आफ्रिकेच्या नायजेरिया या देशात चालवले जात असून बेबी फॉर्मिंग या गोरख धंद्याला येथे म्हटले जाते. अल्पवयीन तरुणींना येथे इतरांना मुलांचा आनंद मिळावा म्हणून बळजबरी आई बनवले जाते. येथे आफ्रिकी मुलींच्या माध्यमातून विदेशींनाही बळजबरी मुले जन्माला घालून ती विकली जातात._* *_..............................................._* ╔══╗ ║██║ _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _  ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █ *- - - - - - - - - - - -●* _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_ https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439 ____________________________ *_दरम्यान हा गोरखधंधा एका मुल न होणाऱ्या दाम्पत्यासाठी मुल जन्माला घातल्यानंतर हा धंदा सुरु झाला. येथे मुली आणि महिला पैशांच्या लालसेपोटी आणून विकले जाते. त्यानंतर त्यांना जबरदस्ती माता होण्यास प्रवृत्त केले जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,बेबी फार्मिंगचा धंदा फक्त नायजेरियाच नाही तर इंडोनेशियासह इतर अनेक देशांतही हॉस्पिटल आणि अनाथाश्रमां सारख्या ठिकाणी बिनधास्तपणे केला जातो. त्यासाठी कमी वयाच्या मुलींना बळजबरी तयार केले जाते. यापैकी बहुतांश मुली अनाथ किंवा गरीब असल्याने त्याही नाइलाजाने तयार होतात._* या गोरखधंद्याची परिस्थिती नायजेरियात अत्यंत बिकट बनली आहे. येथे आई बनणाऱ्या मुलींचे वय १४ ते १७ वर्षांदरम्यान असते. गर्भपातही त्यांना करता येत नाही, कारण नायजेरियात गर्भपात बेकायदेशीर ठरतो. त्याचाच फायदा उचलून माफिया म्हणजे ‘बेबी फार्मर्स’ मुलींवर दबाव आणून मुले जन्माला घालतात आणि त्यांना तीन ते चार लाखांत विकले जाते. मुले हवी असणारेही याला विरोध करत नाही, कारण मेडिकल ट्रिटमेंटऐवजी ही पद्धत अधिक स्वस्त आणि सोपी ठरते. ____________________________ *🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞* ┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓ _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ ┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛ *.............................................* . _*ണคн¡т¡ รεvค*_ . *_:::::∴━━━✿━━━∴::::_* . *༺♥༻​​*
107 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

माहिती

*___________________________* 💫 _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _ 💫 _*⭕ लोकशाही, तुझी जात कंची ? ⭕*_ ____________________________ . *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_* *╰──────•◈•──────╯* ____________________________ . 📯 *_दि. २५ आॅगष्ट २०१८_* 📯 दै सामना अग्रलेख *_जातविरहित समाज, जातीअंताची लढाई, जातीय विषमतेविरुद्धचा लढा असे शाब्दिक बुडबुडे फोडायचे आणि जातींना कुरवाळत बसायचे, हेच ढोंग आपल्या देशात वर्षानुवर्षे सुरू आहे. कोल्हापुरातील 19 नगरसेवकांना जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी घरी पाठवणाऱ्या आदेशामुळे ‘माझी जात कंची’, असा प्रश्न आपल्या लाडक्या लोकशाहीलाही पडला असेल !_* ╔══╗ ║██║ _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _  ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █ *- - - - - - - - - - - -●* _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_ https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439 ____________________________ *_सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे आपल्या समाजातील सर्वाधिक आवडीचा ‘जात’ हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण कुठलेही असो, पण हल्ली देशभरातच जातीय भावना टोकदार झाल्या आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. जातीपातींवरून एकूणच समाजमन अस्वस्थ असताना, ढवळून निघाले असताना सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे जातीचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे. जात पडताळणीचे प्रमाणपत्र वेळेच्या आत सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या 19 नगरसेवकांचे पद रद्द केले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,हे सर्व नगरसेवक लोकशाही मार्गाने जनतेमधून निवडून आले होते हे खरेच, पण त्यांचे पद गेले म्हणून सर्वोच्च न्यायालयालाही दोष देता येणार नाही. कारण शेवटी राज्यघटनेने घालून दिलेली चौकट आणि केंद्रीय सरकार व राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या कायद्यांचा अर्थ लावून त्याबरहुकूम निवाडा करणे एवढेच काम न्यायालयाच्या हाती असते. तेच काम कोल्हापूरच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केले. महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल ऍक्टच्या कलम 9 नुसार राखीव जागांवरून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसेल तर ते सहा महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे._* मात्र सहा महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र निवडून आलेल्या उमेदवाराने आयोगाकडे सादर केले नाही तर त्याचे पद आपोआप रद्द करण्याची तरतूद या कायद्यातच करण्यात आली आहे. आता कायदाच असा आहे म्हटल्यावर सर्वोच्च न्यायालयावर खापर फोडण्यात तरी काय हशील! ते काही असो, परंतु ज्या लोकशाही व्यवस्थेचा आपण ऊठसूट उदो उदो करीत असतो त्याच लोकशाहीत जनतेच्या कौलापेक्षाही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची ‘जात’ आणि त्यांच्याकडे ‘असलेले’ किंवा ‘नसलेले’ जातीचे प्रमाणपत्र हे अधिक प्रभावी ठरते. कोल्हापूर प्रकरणात तेच घडले. लोकशाहीतील सर्वात मोठी कसोटी असलेली ‘निवडणूक’ निप्रभ ठरली आणि जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्दय़ावरून 19 लोकप्रतिनिधींचे नगरसेवकपद एका फटक्यासरशी काढून घेण्यात आले. पुन्हा हा विषय आता केवळ कोल्हापूरच्या 19 नगरसेवकांपुरता मर्यादित राहणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही निकाल हा अंतिम शब्द ठरतो आणि एका प्रकरणातील निकाल पुढील असंख्य प्रकरणांसाठी जसाच्या तसा लागू केला जातो. याचा अर्थ स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या हजारो लोकप्रतिनिधींना या निकालाचा फटका बसू शकतो. ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांचे सदस्य, नगरपालिका, महापालिकांचे नगरसेवक अशा हजारो लोकप्रतिनिधींपैकी काही हजार निर्वाचित उमेदवार या बडग्यामुळे उद्या अपात्र ठरतील. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यास विरोध असण्याचे कारण नाही. पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची जात खरी की खोटी, त्यांचे प्रमाणपत्र वैध की अवैध हे तपासणारी सरकारी यंत्रणा किती सक्षम आहे, पडताळणी समित्यांकडे गेलेले अर्ज वर्षानुवर्षे का लटकून पडतात, याचा विचार कोणी करायचा? सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर अशा प्रत्येक ठिकाणी नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे आधीच सदैव कुठल्या ना कुठल्या निवडणुकीत बुडालेल्या या देशात जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींच्या हजारो रिक्त जागांवर पोटनिवडणुकांचा सपाटा सुरू करावा लागेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचे राजकीय आडाखे बांधण्यापेक्षा जात प्रमाणपत्रांमुळे पुनः पुन्हा पोटनिवडणुका घेण्याची थेरं हिंदुस्थानसारख्या गरीब देशाला परवडणारी आहेत काय, याचा विचार सत्तेतील धुरिणांनी करायला हवा. ज्या महाभागांनी जातीचे बोगस प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली त्यांना सहानुभूती दाखवण्याची मुळीच गरज नाही. त्यांच्यावर कायद्यानुसार जी काही कारवाई असेल ती जरूर करा, पण या आधुनिक युगात जातीच्या पलीकडे जाऊन आपण कधी विचार करणार आहोत की नाही? जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत, शिक्षणापासून नोकरीपर्यंत आणि जनगणनेपासून राजकारणापर्यंत सगळीकडेच ‘जात’ चवीने चघळत बसायची आणि वर पुन्हा ‘आम्ही जातीयवादाविरुद्ध आहोत’ असे सांगायचे, हे थोतांड आहे. जातविरहित समाज, जातीअंताची लढाई, जातीय विषमतेविरुद्धचा लढा असे शाब्दिक बुडबुडे फोडायचे आणि जातींना कुरवाळत बसायचे, हेच ढोंग आपल्या देशात वर्षानुवर्षे सुरू आहे. कोल्हापुरातील 19 नगरसेवकांना जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी घरी पाठवणाऱ्या आदेशामुळे ‘माझी जात कंची’, असा प्रश्न आपल्या लाडक्या लोकशाहीलाही पडला असेल! ____________________________ *🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞* ┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓ _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ ┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛ *.............................................* . _*ണคн¡т¡ รεvค*_ . *_:::::∴━━━✿━━━∴::::_* . *ℰ⍲‿⍲ℰ*
107 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

माहिती

*___________________________* 💫 _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _ 💫 _*⭕ जपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा ! ⭕*_ ____________________________ *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_* *╰──────•◈•──────╯* ____________________________ . 📯 *_दि. १ सप्टेंबर २०१८_* 📯 . *_आपणांपैकी फार कमी जणांना हे माहिती असेल की जपानमध्ये कमीत कमी २० हिंदू दैवतं नियमीत पूजिले जातात.जपानमध्ये सरस्वती मातेची अगणित मंदिरं जपानमध्ये आहेत. सरस्वती शिवाय लक्ष्मी माता, इंद्रदेव, ब्रह्मा, गणेश ह्यांची उपासना जपानमध्ये प्रामुख्याने होते. एवढंच नाही, तर भारतीय हिंदू ज्या दैवतांना विसरून गेले आहेत, त्यांचीसुद्धा जपानमध्ये आराधना केली जाते._* *_जपान फाउंडेशन आणि चित्रपट निर्माते तथा art-historian – Benoy K Behl ह्यांनी ११ जानेवारी ते २१ जानेवारी २०१६ या काळात जपानमधल्या Indian Museum मध्ये काही दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. ह्या फोटोंमधून जपानचं भारतीय पुरातन वारस्यासोबत असलेलं नातं दिसलं._* *_..............................................._* ╔══╗ ║██║ _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _  ╚══╝ ▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █ *- - - - - - - - - - - -●* _*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_ https://m.facebook.com/story.php?story_fbid=586133558451238&id=100011637976439 ____________________________ *_Behl आपल्या research मधे म्हणतात, “गौतम बुद्धांच्या शिकवणीचा जपानी जीवनमानावर प्रभाव आहे. रोज अनेक लोक बौद्ध मंदिरांमध्ये जातात. गौतम बुद्धांशिवाय अनेक पुरातन भारतीय देवतांची आराधना जपानमध्ये होत असते. (ह्यामुळे) भारतीयांना जपानमध्ये घरी (भारतात) असल्यासारखं वाटतं.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,जपानने भारतीय वारसा जपल्याचं एक उदाहरण म्हणजे ६ व्या शतकातील संस्कृतची “सिद्धम” लिपी भारतातून नामशेष झाली असली तरी जपानमध्ये ती टिकवून ठेवली गेली आहे.एवढंच नाही तर ह्या लिपीतील संस्कृत बीजाक्षरंसुद्धा जतन केल्या गेली आहेत. प्रत्येक देवतेचं एक बीजाक्षर आहे, त्यामुळे ह्या बिजाक्षरांचा अर्थ जरी समजत नसला तरी त्यांना पवित्र मानलं नातं.Behl ह्यांच्या research नुसार, आजही कोयासन इथे “सिद्धम” लिपीत संस्कृत शिकवली जाते. अनेक जपानी शब्द संस्कृतमधून उगम पावतात. हेच काय, जपानमधे “सुजाता” नावाचा मोठा दूधाचा brand आहे._* Behl ह्यांच्या मतानुसार Colonial education system मुळे भारताचा स्वतःच्या इतिहासाशी जसा संबंध तुटला, तसं जपानचं झालं नाही. म्हणूनच जपानमध्ये ऐतिहासिक वारसा जपला गेला आणि भारताला आपलाच इतिहास पाश्चात्यांकडून जाणून घ्यावा लागतो. ____________________________ *🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞* ┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓ _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ ┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛ *.............................................* . _*ണคн¡т¡ รεvค*_ . *_:::::∴━━━✿━━━∴::::_* . *༺♥༻​​*
140 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post