#

🗞20 एप्रिल '19 न्यूज

🔴👉 'सर्प मित्र वनिता बोराडे' यांच्या सन्मानार्थ डाक विभागाने जारी केले "टपाल तिकीट". 20 Apr 2019...मेहकर. वने व वन्य जीव निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात आपल्या अलौकिक कार्याचा ठसा उमटवणार्‍या देशाच्या प्रथम महिला सर्प मित्र वनिता बोराडे यांनी मागील 35 वर्षा पासून 51,000 पेक्षा जास्त विषारी व बिन विषारी साप नागरी परिसरातून पकडून वन विभागामध्ये नोंदणीकृत करून जंगलात सोडल्याचा विश्व विक्रम नोंदविला आहे. केंद्र सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या निस्वार्थ सर्प सेवा व जन जागरण कार्याची दखल घेऊन त्यांच्या सन्मानार्थ हिंदुस्थान सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या छायाचित्र सह टपाल तिकीट जारी केले आहे. हजारो सापांना व लोकांना जीवदान देणार्‍या देशाच्या प्रथम महिला सर्प मित्र म्हणून जगभर सुप्रसिद्ध असलेल्या सर्प मित्र वनिता बोराडे यांनी प्रसंगी प्राण पणाला लावून अतिशय धोकादायक आणि अनिश्चित असलेल्या अशा सर्प सेवा कार्याची सुरुवात मागील 35 वर्षा पासून महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील छोट्याशा बोथा या गावी केली. निस्वार्थपणे सर्प संरक्षण संवर्धन व संशोधन करणार्‍या वनिता बोराडे यांनी आपल्या घर परिवाराची जबाबदारी सांभाळून जन माणसामध्ये सर्प विषयक जन जागरण व प्रबोधन करून लोकांची भीती नष्ट करून सापांविषयी प्रीती वृद्धिंगत केली. त्यांचे या क्षेत्रातील विशेष योगदान विचारात घेऊन हिंदुस्थान सरकारच्या डाक विभागाकडे विश्व संविधान परिषदेचे आजीव सभासद शांतिदूत ज्येष्ठ समाज सेवक डॉक्टर सुधीर तारे यांनी सातत्याने पाठ पुरावा केला. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच सर्प मित्र वनिता बोराडे यांचे टपाल तिकिट हिंदुस्थान सरकारच्या डाक विभागाने जारी केले. याची प्रथम प्रत श्री क्षेत्र शिर्डी येथे जागतिक किर्तीचे धनगरी ढोल वादक कलावंत तथा वर्ल्ड रेकॉर्ड विनर डॉक्टर पैलवान बाळासाहेब मंगसुळे यांचे शुभ हस्ते समारंभ पूर्वक सर्प मित्र वनिता बोराडे यांना प्रदान करण्यात आली. या प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तसेच पत्रकार, लेखक आणि दिग्दर्शक यांचीही उपस्थिती होती. साप हा जैव विविधतेचा अनन्य साधारण महत्त्वाचा घटक असून सर्व हिंदुस्थानीय सापांना 1975 च्या वन्य जीव कायद्यान्वये संरक्षण दिलेले आहे. या कायदेशीर बाबींचे जन जागरण करीत आपले संपूर्ण आयुष्य सर्प सेवेसाठी समर्पित करणार्‍या वनिता बोराडे यांनी सर्प दंश बाधित रुग्णांचे वैद्यकीय उपचार करून प्राण देखील वाचविले आहेत. सापांना वाचवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्प विषयक अंध श्रद्धा दूर कशा करता येतील यासाठी अखंडित अविरत आणि सातत्याने प्रयत्न करत असलेल्या सर्प मित्र वनिता बोराडे यांनी सोयरे वनचरे बहु उद्देशीय प्रतिष्ठानची स्थापना करून सर्प विषयक शिक्षण - प्रशिक्षण कार्य शाळा बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण खेड्या पाड्यांमध्ये राबविली. कृषी विभाग, आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, पोलीस विभाग या सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे सर्प वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन विभागातील कर्मचार्‍यांसाठी विशेष प्रशिक्षण देऊन वन्य जीव संरक्षण तसेच वृक्ष संवर्धन कार्यासाठी सर्प मित्र वनिता बोराडे यांनी वेळोवेळी सहभागी होऊन पुढाकार घेतल्याने सकारात्मक चित्र निर्माण झाले. आता लोग साप चावल्या असता सरकारी दवाखान्यात जाऊन वैद्यकीय उपचार घेतात. घरात साप आला असता त्याला मारण्या ऐवजी वन विभागाची व सर्प मित्रांची मदत घेऊन सापांना वाचवितात. ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंबातील शेतकर्‍यांची कन्या असलेल्या वनिता बोराडे यांनी आशिया खंडातील प्रथम महिला सर्प तज्ञ व हिंदुस्थानाची प्रथम महिला सर्प मित्र होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी बॉलीवुडचा अतिशय प्रतिष्ठेचा के.ऐ.एफ. पुरस्कार सर्प मित्र वनिता बोराडे यांना जाहीर केल्याची घोषणा प्रख्यात सिने दिग्दर्शक तथा बॉलीवुडचे अध्यक्ष रविंद्र अरोरा यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली लवकरच हा पुरस्कार सर्प मित्र वनिता बोराडे यांना समारंभ पूर्वक प्रदान केल्या जाणार आहे. आता हिंदुस्थान सरकारच्या डाक विभागाने टपाल टिकिट जारी केल्याने त्यांच्या कार्याची दखल हिंदुस्थान सह संपूर्ण जगाने घेतली आहे. सदर टपाल टिकीट लंडन येथे होणार्‍या अंतर राष्ट्रीय टपाल टिकिट प्रदर्शनात आपल्या हिंदुस्थान सरकार तर्फे ठेवल्या जाणार आहे. आज रोजी हे टपाल टिकिट आपल्या देशातील सर्व जिल्हा पोस्ट ऑफिस मध्ये व पोस्टल म्यूजियम मधे हिंदुस्थान सरकारच्या डाक विभागाने उपलब्ध केले आहे. या अभिनंदनीय कार्याचे कौतुक समाजातील सर्व स्तरातून होत आहे.
346 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post