*मृत्युंजय* *भाग 2* बंगल्यात गेल्यावर एक घाण वास येतो तेव्हा मीनाक्षी म्हणते हा कसला वास आहे? लसणाचा ह्या घरा मध्ये लसणाचा वास येतो आहे रामू काका बोलतात. पण हे घर तर बंद होत तर इथे लसणाचा वर कासकाय येईल? मीनाक्षी विचारते. अग ह्या घरा मध्ये आधी कोणी राहत असेल तेव्हा त्यांच्या कडून हे लसूण राहिले असतील आणि हे घर खूप दिवसांपासून बंद होत त्या मुळे ह्या घरात त्याचा वास पसरला असेल राहुल म्हणतो. नाही हे काहीतरी भलतंच आहे एखाद्या दुष्ट शक्तीला एक ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो रामू काका सांगतात. त्यांच्या बोलण्यावर अजिंक्य हसतो आहि बोलतो अहो काका आपण एकविसाव्या शतकात आहोत आणि अश्या कश्यावरच कोणाचा विश्वास नाही. चला आपण हे सगळं स्वच्छ करू आणि फ्रेश होऊन खाली जेवायला येऊ आणि सगळे तो बंगला स्वच्छ करता व फ़्रेश होण्यासाठी आपल्या खोली मध्ये जातात. थोड्या वेळाने सगळे खाली येतात तेव्हा मिनाक्षीच्या वागण्यात थोडा बदल झाला होता पण सगळ्यांना वाटत की तिला थकवा आला असेल म्हणून ती अस करते आहे व तिला आरामाची गरज आहे आणि सगळे जेवायला बसतात व जेवण करून झाल्यावर सगळे झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे खाली येतात पण मीनाक्षी तिथे नसते म्हणू गणेश तिला तिच्या खोली मध्ये बघायला जातो तर तिथे मीनाक्षी ने मिडी भाषे काहीतरी लिहिलेलं असत आणि जमिनी पासून काही अंतरावर ती हवेत तरंगत असते आणि गणेशला बघून ती जमिनीवर पडते व बेशुद्ध होते. मीनाक्षी गणेश जोऱ्यात ओरडतो गणेशचा आवाज एकूण सगळे मिनाक्षीच्या खोली कडे पळत व मिनाक्षीला बेशुद्ध बघून सगळे गणेशला विचारतात काय झालं गणेश झालेला सगळं प्रकार त्याना सांगतो. मी आले आहे! हे भिंतीवर कोणी लिहिलं आहे मीनाक्षी ने गणेश रामू काकांना सांगतो. तेव्हा रामू काका सांगतात की हिच्या शरीरात एक दुष्ट शक्ती ने प्रवेश केला आहे. म आता काय करायचं अजिक्य विचारतो त्या वर रामू काका सांगतात की आपल्याला लवकरात लवकर थोडे लसूण लागतील तेव्हा अजिंक्य आणि जय रामू काकांना लसूण आणून देतात व रामू काका ते लसूण मिनाक्षीच्या बेडच्या चारही बाजूंला ठेवतात आणि तेव्हाच मीनाक्षी उठून बसते आणि जोऱ्यात ओरडते कोणी कोणी टाकले हे लसूण व रामू काकांवर झेप घेते पण त्या लसनांन मुले तिला बेड च्या बाहेर येत येत नाही कोण कोण आहे तू? मी अरुंधती! का प्रवेश केला आहे हिच्या शरीरात? माझा बदला घेण्या साठी मी आले आहे. कोणता बदला? रामू काका विचारतात तेव्हा अरुंधती सांगते काही वर्षां पूर्वी मी इथे मदत मागण्यांसाठी आले होते तेव्हा येथे राहणाऱ्यांना मला मदत केलो होती पण काही दिवसानंतर त्या माणसाने माझ्यावर अत्याचार करायला सुरुवात केली व मला मारून टाकले तेव्हा पासून मी इथे राहायला येणाऱ्या माणसांना मारून टाकले पण एकदा एका माणसाने ह्या घरात जागो जागी लसूण बांधून ह्या घरात बांधून टाकले पण कल तुम्ही आले व मला मुक्त केले व मी तुम्हा सर्वांना मारण्यासाठी हिच्या शरीरात प्रवेश केला हे ऐकून रामू काका तिला मुक्ती द्यायचं ठरवतात व महामृत्युंजय मंत्र म्हणतात ओम त्र्यबक यजामहें सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वारुक्मी बंधना मृत्योर्मुक्षीय मामृतात।। मंत्र एकूण मीनाक्षी हवेत तरंगते व एक क्षणात खाली पडते व अरुंधतीला मुक्ती मिळते. त्या मुळे कोणतीही वास्तु घेतांना नीट विचार पूर्वक घ्यावी. . . . . गोष्ट आवडल्यास 👍🏻 लाईक करा ☺ शेअर करा आणि आणि गोष्ट कशी वाटली कमेंट करून सांगा व अश्या अनेक गोष्टी वाचण्या साठी मला ➡फॉलो करा @Sahil
#

horror story

horror story - | गुल्य - ShareChat
743 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post