श्रावण शुभेच्छा
#

श्रावण शुभेच्छा

किती वर्ष झाली गेली जरी माय परी तिची सय जात नाही || घरासाठी तिने काया झिजवली तक्रार न केली कधी काही || अवघे सहज नच ठरवून प्रेमाने भरून दिले आम्हां || नच घडविले संस्कार सांगून अवघे जीवन हेची गुरु || असे वागायचे हे न करायचे नव्हते शब्दांचे काही काम || वाट्या आले जैसे तिने ते जीवन आनंदे जगून दाखविले || दुःखाचे चटके सोसले हसत नच सुस्थितित गर्व केला || आणि मृत्यू रोगी लढली खंबीर मानली न हार कदापीही || भोगियले दु:ख वेदना अनेक अश्रू परी एक न दाविला || तिची ती दुर्दम्य जिगीषा पाहून मृत्यूही लपुनी हळू आला || सोबत अजून तिच्या आठवणी जणू ती होवुनी वावरती || मज संभाळती हळू निजवती चुकता दावती मार्ग कधी || हवी ती शिक्षा देवा कुणा देई कधी पण आई नेवू नको ~तानाजी ताकमोगे बापु माझी आई
284 जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
#

श्रावण शुभेच्छा

*☘ बेल*☘ ---------------------- शंकराच्या पूजेतील मानाचे स्थान मिळवलेला हा वृक्ष आहे. याची पाने संयुक्त पध्दतीच्या मांडणीची असतात. याची त्रिदले असतात. देठाकडचा भाग जाड असल्याने तो तोडून शंकराला वाहिला जातो. बेलाचे झाड मध्यम उंचीचे असते. याचे महत्व पुराणात उपनिषदातही विषद केले आहेत.बेल वृक्षाच्या सालीचे काष्ठ बनवतात, हे काष्ठ विशिष्ट मंत्राने मंत्रून ताईतासारखे दंडात बांधतात. उमामहेश्वराला प्रिय असणारा हा वृक्ष, पण गणेशचतुर्थीला गणपतीला बेलाची पानं अर्पण करायचाही प्रघात आहे. संपूर्ण बिल्ववृक्षात औषधी गुणधर्म आहेत. कमी पाण्याच्या जागी हा वृक्ष चांगला वाढतो. बेलाला काटे असतात. फांद्यावर तीन किंवा पाच दलांची संयुक्त पाने येतात. एप्रिल-मे महिन्यात बेलाला हिरवट-पांढरी, गोड वासाची फुलं येतात. बेलफळं गोल, टणक आणि हिरवट- राखट रंगाची असतात. फळाचा गर केशरी तंतुमय असून यात भरपूर बिया असतात. बियांची उगवण क्षमता कमी असते. बेलाला सरफळ, बेलपत्रं, शिवद्र त्रिदल, त्रिपत्र अशी विविध नावे आहेत. "एजल्‌ मारमेलॉज" असे याचे शास्त्रीय नाव आहे. बेल वात, पित्त, कफ असे तिन्हीही दोष नाहीसे करत असल्याने याला विशेष महत्त्व आहे. जुलाबात बेलफळ हे उत्तम औषध आहे. आवेमुळे पोट दुखत असेल तर बेलफळाचा मुरंबा खातात. बेलाच्या पानाचे पाणी प्यायल्यास तरतरी येते. मेंदूज्वर, तापातील वाताने रोगी बडबडत असेल तर हे पाणी पिण्यास देतात. त्वचारोगावरही बेल उपयोगी आहे. पोटात जंत झाल्यास बेलाच्या पानांचा रस घेतात. उलटी थांबण्यासाठी आंब्याच्या कोयीसह बेलफळाचा काढा देतात. शौचावाटे रक्त पडत असेल तर याचे चाटण उपयोगी आहे. उष्णतेमुळे तोंड आल्यास बेलफळ फोडून पाण्यात कढवावे व त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. अंगात शक्ती येण्यासाठी बेलफळाचा अर्क काढून तो खावा आणि त्यावर गायीचे दूध प्यावे. बेल रक्तशुद्धी करणारा आहे. बेलफळाचे सरबत रुचकर लागते. ते भूक वाढवणारे आहे. बेलाच्या खोडातून उत्तम प्रतीचा डिंक मिळतो. ======================== *श्रीधर कुलकर्णी* *ज्ञानामृत मंच समुह*
225 जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post