चला वारीला
#

चला वारीला

"एक एका लागतील पायी रे"। ..... संत तुकाराम महाराजांच्या अभंगात दिंडीतील वारकऱ्यांच्या मनातील जिव्हाळ्याचे भाव अचूक टिपले आहेत. वारकरी विठ्ठल भेटीच्या ओढीने व्याकुळ झालेले असतात. पांडुरंगाचे मुखदर्शन आणि चरण स्पर्श यापलीकडे त्यांची अन्य काही अपेक्षा नसते. मातेकडे बाळ जसे आनंदाने झेपावते, त्याच आतुरतेने वारकरी विठू माऊलीच्या दर्शनाला आसुसले असतात. त्यांच्यातला उच्च नीच भाव गळून पडलेला असतो. विठुरायाची लेकरे वारीच्या आनंद सागरात मनमुराद श्रद्धायुक्त अंतःकरणाने डुंबतात. विठोबात तद्रुप होतात. म्हणूनच एकमेकाच्या पायी पडतात. एकमेका लोटांगणे जाती अशी लीन समर्पणाची भावना त्यांच्या ठायी एकवटते. एक दुसऱ्याला माऊली संबोधतात. सर्व चराचरात त्यांना विठुरायाचेच दर्शन होते. लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्र येतात परंतु शिस्त सुरक्षा असले प्रश्न कधी उदभवत नाहीत. दिंडी सारखे सर्व समभावाचे दुसरे उत्तम उदाहरण शोधुनही सापडणार नाही. निष्काम भक्तिचा आठ शतकापूर्वीचा सानंद अविरत सोहळा म्हणूनच जागतिक आश्चर्याचा विषय ठरतो. ।।जय हरि विठ्ठल।। 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃 🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🍃 #चला वारीला
172 जणांनी पाहिले
23 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post