#

चंद्र ग्रहण

*या वर्षी गुरुपौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण.* *( संदर्भ आणि सौजन्य : दाते पंचांग. पान क्र.२४)* *या वर्षी गुरु पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे, म्हणजेच आषाढ शुद्ध १५, मंगळवार. दि. १६ व १७ जुलै २०१९ रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे.* ◆ * गुरुपौर्णिमा विशेष टीप.* ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा इ. करता येतात. त्यामुळे १६ जुलै २०१९ रोजी वेधकाळात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन करता येईल. तसेच पौर्णिमेनिमित्त केली जाणारी सत्यनारायण पूजा व कुलधर्म कुलाचार करता येईल आणि दुपारी ४ पर्यंत भोजन घेता येईल. मात्र सायंकाळी वेधकाळात गुरुपूजन करावयाचे असल्यास खडीसाखरेचा प्रसाद घ्यावा. ● *ग्रहण दिसणारे प्रदेश.* भारतासह संपूर्ण आशिया खंड, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर इ. ठिकाणी दिसणार आहे. ● *मुंबई येथील ग्रहण स्थिती.* १) स्पर्श : ०१:३२ रात्री. ( १७ जुलै.) २) मध्य : ०३:०१ रात्री. ( १७ जुलै.) ३) मोक्ष : ०४:३० पहाटे.( १७ जुलै.) ४) पर्व : २ : ५८ मि.( १७ जुलै.) ५) वेधारंभ : दुपारी ४ पासून ( १६ जुलै.) ● *बाल, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भावती स्त्रियांनी रात्री ८ : ४० पासून ते ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. ग्रहण पर्वकाळात म्हणजेच ( रात्री ०१ :३२ ते पहाटे ०४ : ३० ) मात्र पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोपणे ही कर्मे करु नयेत.* ● *पुण्यकाल.* ग्रहणस्पर्शापासून ते ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. ● *वेधारंभ.* हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने ३ प्रहर आधी म्हणजे दुपारी ४ पासून पासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. ● *न दिसणारी किंवा छायाकल्प ग्रहणात वेधादि नियम.* जी ग्रहणे भारतामधून न दिसणारी किंवा छायाकल्प असल्याने या ग्रहणांचे वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत. ( सौजन्य व संदर्भ : दाते पंचांग, पान क्र.२२) उदाहरण : ज्येष्ठ कृष्ण ३० , मंगळवार म्हणजेच २ जुलै २०१९ रोजी खग्रास सूर्यग्रहण असून ते भारतामधून दिसणार नाहीये. महणून वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत. ● *वेधकाळात काय करावे ?* १) स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राध्द. २) पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण करावे. ३) आवश्यक पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप इ. कर्मे करता येतात. ● *वेधकाळात काय करु नये ?* १) अभ्यंग, भोजन, अन्न पदार्थ खाऊ नयेत, कामविषयसेवन ही कर्मे करु नयेत. २) अशौच असता ग्रहणकाळात ग्रहणासंबंधी स्नान , दान करण्यापुरती शुद्धी असते. ● *ग्रहणाचे फल.* शुभ फल : कर्क, तुळ, कुंभ, मीन. मिश्र फल : मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक. अनिष्ट फल : वृषभ, कन्या, धनु, मकर. ज्यांना अनिष्टफल आहे त्यांनी आणि गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये. ● ग्रहणाचा काळ गरोदर महिलांनी अधिक जपावा असं कायम सगळ्यांकडून सांगितलं जातं. त्या प्रमाणे घरच्या मंडळींकडून काळजी घेतली देखील जाते. ● *विशेष करुन खालील गोष्टी गरोदर महिलांनी ग्रहण काळात पाळाव्यात.* १) ग्रहणाच्या काळात काहीही खाऊ नये. २) यावेळेत साधं पाणी प्राशन न करता फक्त नारळ पाण्याचे सेवन करावे. ३) रात्री दूध-भात खाल्यास उत्तम. ४) गर्भास कोणत्याही प्रकारे त्रास होणार कृत्य टाळावे. ५) हसतमुख रहावे, उत्साही असावे. यावेळी शक्यतो आळस देऊ नये, कुस बदलू नये तसेच लोळू नये. ६) गरोदर स्त्रीने शांत बसून नामस्मरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. ७) महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही गोष्ट शिळी खाऊ नये. यामध्ये जेवण, दूध आणि पाण्याचा समावेश आहे. #चंद्र ग्रहण
309 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
चंद्रग्रहण माहिती:- सोमवार दि.21 जानेवारी 2019 अर्थात् पौष पौर्णिमेस होणारे खग्रास चंद्रग्रहण ‘भारतात दृश्यमान होणार नाही’. हे ग्रहण सोमवारी होत असल्यामुळे ‘चुडामणी’ संज्ञक आहे. हे ग्रहण इटली, स्पेन,न्युयाॅर्क, कॅलिफोर्निया,रशिया, अर्जेंटिना, मेक्सिको, फ्रान्स,पोर्तुगाल, बेल्जियम, ग्रीस या देशात दृश्यमान होईल. भारतीय स्टॅण्डर्ड समयानुसार या ग्रहणाचा आरंभ 21 जानेवारी 2019 या दिवशी सकाळी 09:04 वाजता होत असून ग्रहणमोक्ष दुपारी 12:20 वाजता होत आहे. ‘भारतात हे ग्रहण दिसत नसल्यामुळे भारतात राहणाऱ्या व्यक्ती तसेच गर्भवतींनी या ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.’ सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते डाॅ.पं.गौरव देशपांडे 9823916297
#

चंद्र ग्रहण

चंद्र ग्रहण - PHIL HART - ShareChat
598 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post