#

🙏संत तुकाराम बीज

तुकाराम बीज ---- या दिवशीच देहू येथील नांदुरकी वृक्ष का हलतो ? नांदुरकी वृक्षाचे दर्शन घेतांना भाविक ‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, म्हणजेच आम्हा साधकांच्या दृष्टीने या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्ताने संतश्रेष्ठ, भक्तशिरोमणी, कृपेचा सागर असणार्‍या, तसेच आपल्या अभंगातून सार्‍या ब्रह्मांडाला उद्धरण्याचे सामर्थ्य असणार्‍या संत तुकारामांची महती थोडक्यात देत आहे.   संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच असण्याचे उदाहरण, म्हणजेच त्यांनी सदेह वैकुंठ गमन करणे श्रीरामाने शरयु नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात, म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते; परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे (वैकुंठगमनाचे) सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते, असे म्हणावे लागेल.   संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असल्याने देहात असूनही नसल्यासारखेच असणे आणि म्हणून त्यांच्यात पूर्णरूपी देवत्व असणे संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प, म्हणजेच जीवनातील नित्य कर्मे करण्याएवढीच शिल्लक होती. बाकी सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते. पूर्णरूपी देवत्व असेच असते.   संत तुकाराम महाराज साक्षीभूत अवस्थेत असणे त्यांनीच वर्णन केलेल्या त्यांच्याच अभंगाच्या महतीनुसार ते किती साक्षीभूत अवस्थेत होते, हे कळते. देवच देवाला ओळखू शकतो. संत किती द्रष्टे असतात आणि ते याच भूमिकेत शिरून त्या त्या स्तरावर लिखाण करून त्यांतील अमूल्य चैतन्याद्वारे ब्रह्मांडाचा उद्धार करण्यासाठी कसे कार्य करतात, तेच यातून लक्षात येते.   देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी असलेला वृक्ष तुकाराम बीज या दिवशी बरोबर दुपारी १२:०२ वाजता हलणे देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.   प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र असणे प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे. देवाच्या भक्तीमुळे संत विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी, म्हणजेच ईश्‍वरी मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने संतांना सर्व ज्ञात असते, असे म्हटले जाते; कारण ईश्‍वरी बुद्धीला सर्वच माहीत असते. नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही. भक्त प्रार्थना करतात, त्या वेळी ईश्‍वर त्यांना त्याचे विचार सुचवतो. हे विचार भक्ताकडून लिहिले जातात, यालाच ईश्‍वरी ज्ञान म्हणतात. गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या ईश्‍वरी ज्ञानातून तुकाराम बिजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष हलण्याविषयी मिळालेले विचार येथे लिहिले आहेत.
602 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
#

🙏संत तुकाराम बीज

🍁 मैत्रीण 🍁
#🙏संत तुकाराम बीज
436 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post