गोंविदा आला रे आला
#

गोंविदा आला रे आला

#love #friendship कृष्ण भेटायलाच पाहिजे.... कृष्ण भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला, अन् कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटायलाच पाहिजे मुळात नात्यांच्या पलिकडचे भावबंध जोडणारा..... एक हक्काचा सवंगडी पाहिजे..... लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचीही वयं वाढत असतात त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलंत असतात तस्संच....ते...पूर्वीचं...निर्व्याज, अबोध नातं पुन्हा जमायला पाहिजे आणि याकरताच आयुष्यात कृष्ण भेटायला पाहिजे...... "तो" कृष्ण "ती" ही असु शकते. आपल्या मनातलं सारं जाणणारी ती असते कधीही आपलं खोलवर मन रीतं करता आलं पाहिजे असा हक्का , विश्वासाचा कृष्ण भेटला पाहिजे........ आपल्या आजुबाजुला तो सापडेलंच असं नाही जोडीदारामध्ये तो गवसेलंच असंही नाही कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे.... सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा पाहिजे आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटला पाहिजे...... खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का? की अनेकांच्या मनात रुंजणारी त्याची ती अश्वस्त मैत्री होती का? त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी अाणि त्यांचीच ऐकु येत असावी रुंजणारी मुरली अनेकांच्या मनामधे मुरणारा तो मुरलीमनोहर प्रत्येकाला भेटायला पाहिजे आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायला पाहिजे.. https://www.facebook.com/workUPbox1/ http://www.workupbox.com
147 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post