#

📝कविता / शायरी/ चारोळी

तु नाते तोडले तरी मी ते तोडले नाही... दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला मी अजूनही पाणी देणे सोडले नाही...!!१!! असे काय केले मी काय घडले माझ्या हातून की निखळ प्रेम करूनही माझ्या जाण्याने तुझे काही बिघडले नाही दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला मी अजूनही पाणी देणे सोडले नाही...!!२!! जन्म घेतल्यापासून इतके प्रेम स्वतावरही केले नाही तरी निष्पाप निरागस माझे प्रेम कधीच तुला कसे कळले नाही दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला मी अजूनही पाणी देणे सोडले नाही...!!३!! तुझ्यावर प्रेम करता करता स्वतःला कधीच गृहीत धरले नाही तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशीही प्रेमाचे नाते कधी जोडले नाही म्हणून तु सोडून गेल्यावर आता माझे ह्या जगात कुठे... अस्तिवच उरले नाही... अस्तिवच उरले नाही...!!४!! #📝कविता / शायरी/ चारोळी
2.1k जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post