💥💫Mrs. Jyoti💫💥
1K views • 2 months ago
#।| अवधूत चिंतन ऊँ श्री गुरूदेव दत्त |।
!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
श्री दत्त तीर्थक्षेत्री कोठे जाल व फलप्राप्ती काय? समस्या काय व सिद्धी काय?
.
१) जर संतानिछुक असाल, मुल होऊ घातले असेल, झाले असेल तर कारंजा गाठून आनंद लहरी येऊ द्या. जिथे जन्मस्थान आहे तिथे सर्व विसरून शांत बसा आणि तुमचा थोडासा अंश आमच्या घरात येऊ द्या असे मागा.
२) जर उद्योग भरभरटीला यायचा असेल, आला असेल तर अमरापूर करा.
३) लहान मुलाला सद्बुद्धी यावी वाटत असेल तर औदुंबर करा.
४) अहंकार येऊ नये असे वाट्त असेल किंवा आला असेल तर शिरोळ ला भिक्षाटन करा, कुमशी करा.
५) जर आपले अजाणता काही झालेले दुष्कृत्य दूर करायचे असेल, भक्ती मार्गात जाताना मन भरकटत असेल तर नृसिंहवाडी करा. ६) जर देवादेवात भेद मनात येत असतील तर हिप्परगी कल्लेश्वर करा.
७) जर कुठलाही मानसिक धक्का अथवा कोलमडून पडण्यासारखे झाले असेल तर उपाय एकच. गाणगापूर संगमावरचे अश्वत्थ औदुंबर भोवती मन निराकार करून आत्मचिंतन, आत्मशुद्धी, स्वत:च्या चुका मान्य करून नवसुरुवात, जे गमावले ते आपले नव्हतेच आणि जे मिळाले किंवा मिळेल तेही आपले नसेल ही भावना ठेवून मन कोरे करून अध्याय वाचावे.
न नशिबाला दोष द्यावा न मनुष्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचे, शनी महाराजांनी दिलेला दणका गुरुमहाराज तशच्या तसा भरून काढत नाहीत. ते दु:ख हलके करून प्रसंग तरून जायला मदत करतात. म्हणतात ना
*"चोरून पोळी वाढली असेल, तर ओरडून तूप मागू नये"*
पण संगम स्थानी वेळ देऊन अपराध मान्य करा.
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
-----------------------------------------------
55 likes
15 shares