महाराष्ट्रातील किल्ले
#

महाराष्ट्रातील किल्ले

--------------------------------------------------- *‼५ मे २०१६ ची माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची फेसबुक पोस्ट‼* --------------------------------------------------- ♏कुगावचा किल्ला !♏ https://m.facebook.com/story.php?story_fbid=162469084151023&id=100011637976439 माहिती सेवा गृप पेठवड़गाव नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सैराट या मराठी चित्रपटात चित्रीत झालेला फोटोमधील हा किल्ला सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सिमेवरील उजनी धरणाखाली गेलेल्या कुगाव या गावातील किल्ला आहे. जुलै १९७६ मध्ये उजनी धरणाचे पाणी अडवल्यानंतर भीमा खोऱ्यातील अनेक मोठमोठ्या गावांना जलसमाधी मिळाली. त्यात अनेक देवस्थाने, कुगावच्या इनामदार जहागीरदारांच्या किल्ल्याचा समावेश होता. निजामाने देवराव इनामदार, जिजाबा इनामदार व नागोबा इनामदार यांना कुगाव व परिसरातील पाच गावे इनाम वतनात दिली होती. सुमारे चारशे वर्षांपूर्वी भीमानदीच्या तीरावर हा भुईकोट किल्ला इनामदार बंधूंनी बांधला. या किल्ल्याच्या संरक्षक भिंती सुमारे पंधरा फुटांपेक्षा जादा रुंदीच्या आहेत. तसेच चारही बाजूला मोठमोठाले बुरूज होते. त्यामधील एकच बुरूज आता अस्तित्वात आहे. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुण्याच्या शनिवारवाड्यापेक्षाही मोठा आहे. या किल्ल्यातून नदीच्या पात्रापर्यंत भुयारी मार्ग होता. किल्ल्याला एकूण तीन प्रवेश दरवाजे आहेत.. यातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस उंच मनोरे आहेत.. समोरून पाहताना हे मनोरे एखाद्या मिनारासारखे भासतात.. मुख्य द्वाराशेजारी देवडी असून.. तिला कमान असलेली रुंद खिडकी आहे. किल्ल्याला एकूण सहा बुरुज असून, त्याचा आकार साधारण चौरस असा आहे.. उजवीकडे कोपरयात बुरुज आणि गडाचा दुसरा दरवाजा नजरेस पडतो.. मग पुन्हा डावीकडे काटकोनात शेवटपर्यंत जाताच.. एक चोर दरवाजा.. बुरुज.. तलाव आणि मागे एका बेटासारखे दिसणारे मंदिर नजरेस पडते.. इथे एक अर्धवट तुटलेला रांजण नजरेस पडतो.. गडाच्या मध्यभागी वाड्याचे चौथरे नजरेस पडतात.. गडाच्या मध्यभागी .. वाहून आलेली माती भरली आहे.. आणि ठिकठिकाणी पाण्याची डबकी.. दरवाजाच्या कमानीवरील गोलाकार छत पाहायला मिळते.. मग डावीकडचा मनोरा आणि दरवाजाची भिंत यातील निमुळत्या जागेतून खाली उतरता येते.. मुख्य दरवाजाच्या डावीकडील खिडकी तून डोकावून पाहिलं.. तर आत देवडी आणि दरवाजाच्या आतील भिंतीचे अवशेष पाहायला मिळाले .. किल्ल्याचा हा भाग अजून सुस्थितीत आहे.. या वाड्याविषयी माहिती देताना इनामदार जहागीरदारांचे आठवे वंशज श्रीपाद इनामदार म्हणाले, ""श्रीमंत मालोजी राजांच्या कार्यकाळात हा किल्ला अत्यंत सुरक्षित असल्याने येथे सैन्यासाठी लागणारी रसद व खजिना ठेवण्यात येत असे. हा किल्ला सुमारे दोन एकरांपेक्षा जादा जागेवर बांधण्यात आला आहे. १९५६ व १९६१ मध्ये भीमा नदीला आलेल्या पुराच्या वेळी संपूर्ण कुगाव व परिसरातील लोकांनी या किल्ल्यात आसरा घेतला होता.''♏ #महाराष्ट्रातील किल्ले
183 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
अप्रतिम मुरुड जंजिरा किल्ला 👍👍👍👍👍👍 रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.
#

महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील किल्ले - ShareChat
541 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गो विशिष्यते’ राजगड...🚩🚩 किल्ले राजगड मोहिमेदरम्यान बालेकिल्ल्यावरील टाक्यातील गाळ काढत असताना शिबंदीच्या घरावरील एक कौल त्यात सापडले आणि 'महाराजांच्या काळी बालेकिल्ला कसा दिसत असेल ?'.... याचे एक कल्पनाचित्र मनामध्ये तयार झाले आणि फक्त कल्पनेनेच अंगावर काटा उभा राहिला... .....पण सततच्या मोहिमांमुळे ते चित्र मनामध्येच राहिले आणि मागील आठवड्यातील जहांगीर आर्ट गँलेरीतील चित्र प्रदर्शन पाहून प्रेरणा अधिक वाढली आणि शेवटी वेळात वेळ काढून ते पूर्ण केले.. (सदरचे चित्र हे माझ्यासारख्या शिवभक्तांच्या कल्पनेतील आहे जे मी इतर असंख्य शिवभक्तांना दाखवू इच्छितो धन्यवाद.... माहिती व चित्रकार : Gajanan Patil....❤
#

महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील किल्ले - Empatil . com contact @ gajananpatil . com Betfelet olay gajanan - ShareChat
683 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
किल्ल्याचे प्रकार...🚩 #वाचा_आणि_share_करा 🚩 दुर्गांचे अनेक प्रकार प्राचीन ग्रंथात आढळतात ते खालीलप्रमाणे- 1. धनुदुर्ग- सभोवार वीस कोसांपर्यन्त अन्यत्र पाणी नसनारा किल्ला 2. महिदुर्ग- बारा हात उंच बुरुज/तटबंदि त्यावर फिरन्यास प्रशस्त फांजी किंवा झरोक्यासारख्या चर्या असलेला किल्ला. 3. अब्दुर्ग- जलदुर्ग 4. वाक्षदुर्ग- घनदाट जंगलाचे संरक्षण असणारा किल्ला 5. नृदुर्ग- हत्ती घोड़े रथ पायदल असा चतुरंग सेनेचे संरक्षण असणारा किल्ला 6. मृद दुर्ग- मातीचा किल्ला 7. अश्मदुर्ग- निव्वळ दगडी किला 8. इष्टिका दुर्ग- वीटा आणि चुण्यात बांधलेला किला 9. मरुदुर्ग- ओसाड वाळवंटातिल किला 10. दारूदुर्ग किंवा मेढेकोट- वेळु किंवा लाकडानी बांधलेला किल्ला माहिती साभार - © मनोज कांबळे
#

महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील किल्ले - ShareChat
962 जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post