Failed to fetch language order
Failed to fetch language order
😂लग्न जोक्स/मीम्स😜
38K Posts • 826M views
Pramod Pawar
2K views 12 days ago
मांडवामध्ये लग्नसोहळा सुरू होता. 😂😂😂 सरपंचाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली... हे लग्न झाल्यामुळे जर कुणाला प्रॉब्लेम होणार असेल तर त्याने पुढं यावं. .... हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं उभ्या आयुष्यात कधी वाटेला जाऊ नये. .... सरपंचाचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री पुढे येऊ लागली. तिच्या हातात एक छोटं बाळ होतं... सगळ्या मंडपात भयाण शांतता.... मग कुजबूज सुरू झाली..... त्या स्त्रीला पाहताच नवऱ्या मुलीने नवरदेव च्या मुस्काटात मारली. मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले. मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर काढली. मुलीच्या भावांनी मुठी वळल्या. पाहुणे मंडळींनी फेटे सोडले.... सरपंचाने , कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं, ताई, तू का पुढे आली आहेस ? . . ती म्हणाली, तुम्ही बोललेलं मागे काहीही ऐकू येत नव्हतं म्हणून!!!! 😍😍😂😂😍😍 नुसती घाई... अन् गैरसमज .... दमच नाही कुणाला 🤣🤣🤣 सोशल मिडियावरच्या 99 टक्के प्रतिक्रिया अश्याच असतात...म्हणून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्या अगोदर स्वतः खात्री करून घ्या....🙏 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😂लग्न जोक्स/मीम्स😜 #😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂 #💔प्रेम की यातना
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
22 likes
18 shares