#

🗞 1 ऑगस्ट '19 न्यूज

🔴👉 'वाहतूकीचे' नियम पाळा, नाही तर "दहा पट दंड" भरा.! 1 Aug 2019...नवी दिल्ली. बहुचर्चित मोटार वाहन दुरुस्ती विधेयक बुधवारी प्रदीर्घ चर्चेनंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. वाहतुकीचे नियम मोडणे आता चांगलेच महाग पडणार आहे. किमान चार पट ते कमाल दहा पट दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. ‘हिट अँड रन’ मधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखा पर्यंत भरपाई मिळणार आहे. दारू पिऊन गाडी चालविल्यास 2 हजार ऐवजी 10 हजार रूपये दंड आकारला जाईल. हेल्मेट नसेल तर 100 रुपया ऐवजी 1,000 रूपये दंड द्यावा लागेल. गाडीचा इन्शुरन्स नसल्यास 2,000 रुपये भरावे लागतील. मोटार वाहन दुरुस्ती विधेयक - 2019 वर प्रदिर्घ चर्चा झाली. चर्चेनंतर विधेयकावर मतदान झाले. 108 विरूद्ध 13 मतांनी विधेयक मंजूर करण्यात आले. चर्चेला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशातील वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी विधेयकात भर देण्यात आले आहे. मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे रस्ते सुरक्षेच्या सध्याच्या कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. ⭕ काय आहेत तरतुदी.? वाहन परवाना नसल्यास सध्या 500 रुपये दंड आकारला जातो. आता दंडाची रक्कम 5 हजार रुपये करण्यात आली आहे. रॅश ड्रायव्हींग करणाऱ्यांना 5 हजार रूपये दंड आकारणार. सीट बेल्ट न वापरल्यास 1 हजार रूपये दंड घेतला जाईल. तसेच झेब्रा क्रॉसिंग सह इतर वाहतूक नियम मोडल्यास 100 ऐवजी 500 रुपये दंड आकारला जाईल. रुग्णवाहिकेस रस्ता न दिल्यास 10 हजारांचा दंड केला जाईल. अल्पवयीन मुलाने गाडी चालविल्यास गाडीच्या मालकास 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षे कारावासाची शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. #🗞 1 ऑगस्ट '19 न्यूज
333 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post