#

jara hatke

*झाकली मूठ सव्वालाखाची* एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्‍याला कळले. त्याने सहा हजार रुपयाचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले रंगवले. आणि राजा आला पूजेला आणि त्याने दक्षिणा म्हणून *चार आणे* ठेवले. पुजार्‍याला तिथेच घाम फुटला. सहा हजार कर्ज काढून रंगवले आणि राजाने फक्त चार आणे ठेवले. *पुजारी ही हुशार* राजा गेला अन ह्याने ते चार आणे हातात घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला. राजाने एक वस्तू ठेवली आहे ते मला झेपणार नाही म्हणून मी लिलाव करतोय. *एक वार* आता राजाने ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का ? पहिलाच वार दहा हजार पासून... पुजारी नाही परवडत... पन्नास हजार.. पुजारी नाही... राजाला पहारेकर्‍यामार्फत कळते काय चाललंय ते कि पुजाऱ्याने तुम्ही ठेवलेल्या वस्तूचा लिलाव करतोय म्हणून म्हणून.... *दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय...* राजा तसा पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला... हे माझे माय, सव्वालाख देतो पण कुणाला दाखवू नको.... तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली.... *...झाकली मूठ सव्वालाखाची...*
617 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post