बातम्या
#

बातम्या

_* News Updates*_ ● नवी दिल्ली - देशभरातील म्युच्युअल फंडांचे मत्ता मूल्य (असेट बेस) 25.2 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचले ● नवी दिल्ली - अॅट्रॉसिटी कायद्याला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान; केंद्राला 6 आठवड्यांत बाजू मांडण्याचे आदेश ● नवी दिल्ली - उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी रवाना, द्वितीय जागतिक हिंदू महासभेला संबोधित करणार _*जाहिरातीसाठी संपर्क*_ : 9860025559 ● बिजींग - सागरी क्षेत्रातील पर्यावरणीय माहिती संकलीत करण्यासाठी तसेच जागतिक हवामान बदलाचा सागरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी चीनने एक स्वतंत्र उपग्रह अवकाशात केला प्रक्षेपित ● मुंबई - मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा 2.50 लाख; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, अनुसूचित जातींना दिलासा ● मुंबई - भाजप आमदार राम कदमांना वक्तव्य भोवणार, घाटकोपरनंतर बार्शीमध्येही गुन्हा दाखल ● मुंबई - एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे देण्याच्या मागणीवरील याचिकांवर 17 सप्टेंबरपर्यंत सुनावणी नाही : हायकोर्ट ● शाओमीने रेडमी 6 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची केली घोषणा, हा फोन दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध ● पाचव्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या दिवसअखेर 7 बाद 198 धावा केल्या, भारताकडून इशांत शर्माने 3 तर जडेजा आणि बुमराहने प्रत्येकी 2 बळी टिपले ● 'ये है मोहब्बते' मालिकेतील आदर्श सून 'इशिता' अर्थात दिव्यांका त्रिपाठी 'शेफ' वेबसीरिजमध्ये झळकणार ● सांगली - शेतकऱ्यांच्या नावावर 59 हजार कोटींचे कर्ज उचलल्याची खळबळजनक माहिती समोर ● सांगली - महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यपदावरून सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांत धुसफूस सुरू, यामध्ये भाजपमध्ये सर्वाधिक वाद
656 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post