📝दिवाळी लेख
बायको: व्हय वं कवा आनताय किराणा!! सन जवळ यालाय मनलं दोन-चार फराळाची ताटं बनविली असती!! लेकरं हायती घरात सन केला न्हाई तर गोड दिसल का!?.. नवरा: जरा थांब दोन दिस... पैश्या-आडक्याची काय सोय हुत्याय का बगतो!!..दुकानदाराचं आदिचं जरा देनं हाय...तो अजून ऊदार देणार नाय आपल्याला!... बायको: व्हय वं तुम्हाला राग येणार नसल तर एक बोलु का!!? नवरा: बोल कि मला कशाला राग ईल!! बायको: माझ्या दादाला ईचारून बगु का!? तो काय न्हाई म्हणार नाय मला!! हजार दोन हजार तर देईलच तो आपल्याला!... नवरा: नगं नगं आजाबात नगं...अगं तु मागितल्यावर तो न्हाई म्हणार नाय हे समदं खरं हाय....पण त्येचा तेला पण संसार हाय.. मुलं-बाळं हायती वरून आपला अजून तरास!! ते काही नाही...नगं बोलु त्येला कायबी.... तो पण आपल्यावाणी एक शेतकरीच हाय त्येच्याकडं तर कुटुन येणाराय पैसा!!? गेलसाली पावसानं साथ दिली नाय...वाटलं आवंदा तर सगळं यवस्थित हुईल!! पण काय माहित एवढा का नाराज झालाय वरूण राजा आम्हा शेतकऱ्यावर!? मनच राहिलं नाय बग हासत-खेळत सण-वार साजरा करायचं....(मनगटाने डोळे पुसत).... बायको: आवं असं नाराज हुन कसं चालल!? लेकरा-बाळांनी भरलेल्या घरात असं रडतं का कुणी!! समदं ठिक हुईल बघा...ऊद्या बाजारला जावा अन् तेवढं (बियाणासाठी ठेवलेलं) सोयाबीन ईकुन त्यात जेवढा ईल तेवढा बाजार भरून आणा... लेकरानला कापडं-बिपडं काही नको औंदा साल!... बघु पुन्हा कवा तर आनु....नवी कापडं नसल्यावर काय सण व्हत नाय का काय!?.. त्येंच्या नशिबात आसल तर म्होरल्या वर्साची दिवाळी लय जोरात करू!!.... #टिप: शहरात चांगल्या प्रतिची नोकरी करणार्या भावांनो चार दिवसाच्या सणासाठी पाण्यासारखा पैसा ओतू नका!...बघा आज आपला पोशिंदा/बळीराजा किती संकटात सापडला आहे!! शक्य झाल्यास किमान एखाद्या शेतकरी बांधवाच्या एका लेकराची वार्षिक फि भरा किंवा कोणत्याही प्रकारे आर्थिक मदत करून बघा खूप समाधान वाटेल!....👍👍👍🙏🙏🙏🙏
#

📝दिवाळी लेख

📝दिवाळी लेख - ShareChat
4.1k जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post