💐माता रमाई आंबेडकर जयंती
थोर पुरुषाची पत्नी होणे हे जसे महान कार्य, तशीच एक मोठी जबाबदारीही असते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विसाव्या शतकातील एक महापुरुष. रमाईंनी बाबासाहेबांच्या ध्येयपथातील काट्यांची झाडलोट करून त्यांचा ध्येयवाद खडतर मार्ग अधिक सुगम बनविला. पतीच्या स्वीकृत कष्टमय जीवनात त्यांनी प्रामाणिकपणाने साथ दिली. आपल्या कौटुंबिक सुखासाठी त्यांनी बाबासाहेबांकडून कसलीही अपेक्षा केली नाही. उलट बाबासाहेबांच्या प्रत्येक लहान-मोठया कार्यात त्यांना यथाशक्ती प्रोत्साहित करून व स्फूर्ती देऊन त्यांच्या मागे सावलीसारख्या सतत उभ्या राहिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील आपली पत्नी रमाईच्या कष्टमय जीवनाची जाणीव होती. रमाई सारखी सहचारिणी लाभली म्हणूनच आपण परदेशात जाऊन वर्षानुवर्षे उच्च शिक्षण घेऊ शकलो व अस्पृश्योद्धारा च्या सामाजिक कार्यात पूर्णपणे समरस होऊ शकलो, ही गोष्ट किंवा वस्तुस्थिती ते कधीही अमान्य करीत नसत. पतीनिष्ठ रमाईचे उदाहरण दृष्टीसमोर ठेवून बाबासाहेब जाहीरपणे सांगत असत की, स्त्री हा समाजाचा अलंकार आहे. आपल्या कुटुंबाच्या अन कुळाचा नावलौकिक स्त्रियांच्या शिलावरच अवलंबून असतो. स्त्री ही जशी गृहिणी तशीच सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता आहे. परंतु वैवाहिक जीवनाच्या प्रारंभीच्या काळात त्यांच्यावर उपासमार, हालपेष्ट, दुःख, दारिद्र्य व चिंता यांचे जे प्रसंग ओढवले त्यामुळे त्यांच्या शरीर-प्रकृतीवर जो परिणाम तो कायमचाच ,त्या नेहमी आजारी असायच्या आणि एकदा त्या अंथरुणाला खिळल्या त्या कायामच्याच २७ मे १९३५ ला त्यांनी हळूच डोळे उघडले. आपल्याजवळ बाबासाहेबांना पाहून त्यांना मानसिक समाधान झाले. बाबासाहेबांकडे एकटक पाहून त्यांनी स्मित हास्य केले. आणि पतीचे रूप ती साध्वी आपल्या हृदयात नेहमीकरिता जणू साठवून ठेवीत होती. बाबासाहेबांनी देखील आपल्या मोठेपणाचे सारे श्रेय आपल्या पत्नी रमाई यांनाच दिले आहे. "पाकिस्तान आणि भारताचे विभाजन" हा मौलिक ग्रंथ लिहून डॉ.बाबासाहेबांनी आपली सहचारिणी रमाईंना अर्पण केला आणि त्यात ते म्हणतात, " जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा, जिचा उमदा स्वभाव, जिचे स्वच्छ चारित्र्य, जिची सुखद सहानुभूती, माझ्याबरोबर दुःख भोगण्याची तत्परता आणि आमच्या मित्र-विरहित , काळजीच्या आणि गरजांच्या दिवसांत जिने मला अविरत साथ दिली, त्या 'रामू' च्या स्मृतीस गुणग्राहकतेची खुण म्हणून माझी कलाकृती मी अर्पण करतो !" आज ७ फेब्रुवारी म्हणजे माता रमाईंचा जन्मदिवस... अश्या ह्या कोट्यावधी पददलितांच्या मातोश्री रमाई आज देहाने आपल्यातून निघून गेल्या असल्या ,तरी त्यांनी आजीवन अनुभवलेल्या सुख-दुःखाच्या नानाविध घटनांच्या पावन स्मृतीतीस मात्र कायम मागे शिल्लक राहतील आणि त्यांची जीवन गाथा भावी पिढीला मार्गदर्शन करीत राहतील.. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मेणबत्ती प्रमाणे क्षणोक्षणी जळून साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन व कोटी कोटी प्रणाम ..🙏🙏 प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक "स्त्री" असते असे म्हटले जाते आणि काही अंशी ते खरे ही आहे... अनेक यशस्वी पुरुषांच्या पाठीशी ढाल बनून त्यांची पत्नी उभी राहिल्यानेच यशस्वी व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकल्या.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवर्‍या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणार्‍या "रमाईंबद्दल" जास्त लोकांना माहिती नाही... त्या आई.. त्या स्त्री ला अभिवादन !! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
#

💐माता रमाई आंबेडकर जयंती

💐माता रमाई आंबेडकर जयंती - ShareChat
1.1k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
आज ७ फेब्रुवारी म्हणजे माता रमाईंचा जन्मदिवस... अश्या ह्या कोट्यावधी पद दलितांच्या मातोश्री रमाई आज देहाने आपल्यातून निघून गेल्या असल्या ,तरी त्यांनी आजीवन अनुभवलेल्या सुख-दुःखाच्या नानाविध घटनांच्या पावन स्मृतीतीस मात्र कायम मागे शिल्लक राहतील आणि त्यांची जीवन गाथा भावी पिढीला मार्गदर्शन करीत राहतील.. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मेणबत्ती प्रमाणे क्षणोक्षणी जळून साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन व कोटी कोटी प्रणाम .. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक 'स्त्री' असते असे म्हटले जाते आणि काही अंशी ते खरे ही आहे... अनेक यशस्वी पुरुषांच्या पाठीशी ढाल बनून त्यांची पत्नी उभी राहिल्यानेच यशस्वी व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकल्या.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवर्‍या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणार्‍या 'रमाईंबद्दल' जास्त लोकांना माहिती नाही... त्या आई.. त्या स्त्री ला अभिवादन !!.....#माता_रमाई_तुझं_कोटी_कोटी_ वंदन #जय_मता_रमाई #जय_भिम #नमो_बुद्धाय
#

💐माता रमाई आंबेडकर जयंती

💐माता रमाई आंबेडकर जयंती - ShareChat
912 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post