#

विचार

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो समजत नाही की मी घडलो की बिघडलो 😌 सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो समजत नाही की मी घडलो की बिघडलो 👵 धन जमा करताना समाधान विसरलो तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो समजत नाही की मी घडलो की बिघडलो 😌 टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो जाहिरातीच्या मार्‍यामुळे चागलं निवडणं विसरलो गाडी आल्यापासून चालणं विसरलो समजत नाही की मी घडलो की बिघडलो 💻 मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो समजत नाही की मी घडलो की बिघडलो 📱 संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो समजत नाही की मी घडलो की बिघडलो 🎄 परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो समजत नाही की मी घडलो की बिघडलो 🍄🌺 बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो समजत नाही की मी घडलो की बिघडलो 💿📻 स्वतःमध्ये मग्न राहून दुस-‍याच्या विचार विसरलो सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो समजत नाही की मी घडलो की बिघडलो
396 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post