🌹🌹मैत्री 🌹🌹
#

🌹स्त्री सम्मान🌹

❤️💛❤️💛 स्त्रीचं अस्तित्व 💛❤️💛❤️ त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार.. बातमी पूर्ण न वाचताच तो बोलून गेला हिच्या आईचं लक्ष कुठे होत देव जाणे.. ती समोरच ऊभी होती खरतर तिला त्याच्या ह्या बोलण्याचा राग आला असावा पण ती काहीच बोलली नाही. सकाळी त्याला लवकर Office मध्ये जायचं होतं, रात्रीचं जेवण झाल्यावर तिला सकाळी मला लवकर ऊठव इतकच बोलून तो झोपायला निघून गेला. alarm लवायलाही तो गडबडीत विसरून गेला. सकाळी त्याला जाग आली, त्याने घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 9 वाजले होते. तिला आवाज देतच तो ऊठला त्याची खूप चिडचिड होत होती पण ती कुठेच दिसत नव्हती. त्याने आईलाही आवाज दिला चहासाठी पण तीही त्याला घरी दिसली नाही. कसंबसं आवरून आणि Meeting ची important file घरी विसरून तो घाईगडबडीत Office मध्ये पोहोचला. Bossने त्याचा चांगलाच पाणऊतारा केला. त्या दोघी आज घरी नव्हत्या त्यामुळं त्याची ही अवस्था झाली होती. थोडं मन मोकळं करून बोलावं म्हणून तो त्याच्या जवळच्या मैत्रीणीच्या Cabin मध्ये गेला तर तीही आज नव्हती आता मात्र त्याचा चेहरा अगदीच रडवेला झाला. संध्याकाळी घरी आल्यावर शेजारची परी तिच्या गोड बोबड्या बोलाने त्याचा कंटाळा घालवायची तीही दिसली नाही. त्या दोघी ताईच्या घरी गेल्या असाव्यात म्हणून त्याने ताईला phone केला तर तिचाही phone लागला नाही रूममध्ये गेला तर चिट्ठी सापडली आम्ही सगळ्या निघून जातोय जेव्हा तुम्हाला आमची किंमत कळेल तेव्हाच परत येऊ. त्याला घाम फुटला अश्रू अनावर झाले. तेवढ्यात त्याला तिची हाक कानावर आली आणि अचानक तो झोपेतून जागा झाला. त्याने तिला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागला, आज मला स्त्रीच्या अस्तित्वाचा अर्थ उमगला माफ कर मला!!तिला काही उमजेना, पण तिच्या चेहऱ्यावर समाधानाची हास्यकळी अलगद खुलली. #🌹स्त्री सम्मान🌹 #🌹🌹मैत्री 🌹🌹 #🌻🍀🍁मैत्री 🌻🍀🍁 #मैत्री😘
110 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#

🌹🌹मैत्री 🌹🌹

#🌹🌹मैत्री 🌹🌹 *गच्च मिठी मारली पाहीजे* *हातात हात पकडला पाहीजे* *नातं कोणतंही असो* *मतभेद कितीही असो* *संबध तोडण्याची भाषा* *मुळीच कधी करू नये* *प्रत्येक माणूस वेगळा* *विचारसरणी वेगळी* *मनुष्य जन्मा तुझी* *कहाणीच आगळी-वेगळी* *बापा सारखा मुलगा नसतो* *मुला सारखी सून नसते* *नवरा आणि बायकोचे तरी* *कुठे तेवढे पटत असते ?* *जरी नाही पटले तरी* *गाडी मात्र हाकायची आसते* *अबोला धरून विभक्त होऊन* *सार गणितं चुकायचे नसते* *काही धरायचं असतं* *काही सोडायचं असतं* *एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून* *एकमेकाला सोडायचं नसतं* *चुकल्यावर बोलावं* *बोलल्यावर ऐकूण घ्यावं* *एकांतात बसल्यावर* *अंतरंगात डोकवावं* *राग मनात ठेवला म्हणून* *कोणाचं भलं झालं का ?* *बिन फुलाच्या झाडा जवळ* *पाखरू कधी आलं का ?* *समोरची व्यक्ती चुकली तरी* *प्रेम करता आलं पाहिजे* *झालं गेलं विसरून जाऊन* *गच्च मिठी मारली पाहिजे* *स्वागत होईल न होईल* *जाणं येणं चालू ठेवल पाहीजे* *समोरचा जरी चुकला तरी* *म्हणा "खुशाल ठेव देवा त्याला !"* *आयुष्य खूप छोटं आहे* *हां हां म्हणता संपुन जाईल* *प्रेम करायचं राहिलं म्हणून* *शेवटी खूप पश्चताप होईल* *लक्षात ठेवा नात्या पेक्षा* *दुसरं काहीही मोठं नाही* *आपलं माणूस आपल्या जवळ* *या सारखी श्रीमंती नाही !* सर्व आप्तस्वकीयां ना,नातलगांना आणि *सर्व मित्र मैत्रीणीना समर्पित* 🙏🙏🙏
171 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post