✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन
#

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन

SANDY
#✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन ✒📚सॕडीच्या लेखणीतुन...💘वाचा जरा 💝आभासी दुनियेतली हटके प्रेमकहानी !!तो आणि ती!!💓💞 "#तो" आणि "#ती" #भाग-4 हॉलमध्ये लांबलचक घसरुन स्वागत झाल्यावरही "ती" तशीच जागेवर स्तब्ध बसुन होती "#ती"ला राग तर खुपच आला होता पण त्याही पेक्षा त्याला घरात पाहुन "ती"जास्त चकीत झाली होती.. माञ हॉल मध्ये घसरुन पडल्या पेक्षाही त्याच्या समोर घसरुन पडल्याचं "ती"ला जास्त दु:ख वाटत होत.. "ती" एवढी अचानक घसरुन पडली होती की हाच जास्त घाबरला होता...दोघही एकमेकांकडे अप्रत्यक्ष कावरेबावरे होऊन पाहत होते.....पडल्यामुळे "ती"चे केस विस्कटले होते आणि "ती"च्या चेहऱ्यावर एक वेगळीच वेधनादायी भावना निर्माण झाली होती पण एवढ्यातही त्याला "ती"खुप सुंदर दिसत होती...."ती"च्या कडं एकटक असच "ती"ला न्याहाळत पहात बसाव असा एक साधा कोवळा विचार त्याच्या मोकळ्या मनात आला...पण "ती"ला पडल्यामुळे लागलं असल त्यामुळे "ती"ची काहीतरी मदत करावी किंवा कमीत-कमी"ती"ला विचाराव तरी की,,"तुला काही लागल तर नाही नां..?? पण त्याच अस विचारण्याच धाडसच झाल नाही... "तो" तसाच बावऱ्या सारखा जागेवरच बसुन होता... तर दुसरीकडे, हा आपल्या घरात कसा..??" याचा "#ती"स्वत:च्या वेधना विसरुन त्याच्याकडे एकटक पहात खोलवर विचार करत होती....मला ह्यान प्रेमानं ऊचलुन घ्याव असा नकळत विचार "ती"च्या मनात आला आणि प्रेमाच्या सुप्त निर्मळ-निरागस भावनेन "ती"च अंग-अगं शहारल....पण "ती"नं स्वत:ला सावरल आणि ऊठुन ऊभा राहीली आणि तशीच त्याच्याच शेजारी नकळत जाऊन बसली.... "तु ईथ कसा रे.....??? "ती" सहज त्याला म्हणाली..आणि "तो"एकदम घाबरल्या सारखा झाला..त्याच्या डोळ्या समोर लगेच "ती"च्या बाबतीत झालेले दोन प्रसंग ऊभे राहीले...."तु ईकड कोणाकडे आलास....?? "ती"चा आवाज परत एकदा त्याच्या कानापर्यत पोहचला. "तो" सुन्न झाला.....माहीत नाही का पण "तो" घाबरला होता...हे त्याला ही समजत होत पण ईच्छा असतानाही "तो" स्वत:ला सावरु शकत नव्हता...नक्की काय कराव तेच त्याला समजत नव्हत.."" ब्-ब्-ब्-अ..म...म.. मी..मी..मावशी बरोबर आलोय ....."तो" अडखळतच म्हणाला.....""तुला काही लागल तर नाही ना...? त्यान लगेचच "ती"ला वरती पहात विचारल......आत्ताशी विचारतो का..??? "ती" न "ती"च्या नैसर्गिक स्वभावानुसार त्याला सरळ प्रश्न केला....""सॉरी..म्हणत त्यानं "ती"ल़ा कसतरी ऊत्तर दिल.... ईतक्यात "ती"ची आई आणि त्याची मावशी दोघीही हॉल मध्ये आल्या त्यांना पाहताच त्यानं मोकळा श्वास घेतला आणि लगेच पटकन ऊठुन "तो" दुसऱ्या सोप्यावर जाऊन बसला.....त्याला आत्ताशी जरा बर वाटत होतं....खुपवर्षानंतर एखाद्या जेल मधुन सुटका झाल्या सारख त्याला वाटत होतं........ त्याची मावशी आणि "ती"ची आई या दोघीही त्याच्या शेजारी येऊन बसल्या आणि म्हणुन याला आता जास्तच आधार साफडला त्यामुळे त्याला थोड स्वतंञ्य झाल्यासारख वाटलं....""हा "मिरा"चा मुलगा का..???"" त्याच्याकडे कौतुकानं पाहत "ती"च्या आईन त्याच्या मावशीला विचारल...."ती"ची आई हसतमुख आणि खुप प्रेमळ स्वभावाची गृहणी होती..स्वत:च्या श्रीमंतीची कसलीचं घमेंड तीला नव्हती....""हो...मीराचाच धाकला मुलगा आहे हा,,ईथ कॉलेजला आहे......माझ्याकडे रहा म्हणते तर नको म्हणतो...मग मिञासोबत रुमकरुन राहत असतो"" त्याच्या मावशीनं त्याचा हलकासा परीचय"ती"च्या आईला करुन दिला...... दरम्यान त्या दोघींचे संभाषण चालु असताना हे दोघही एकमेकांना गुपचुप न्याहाळत होते....त्याला "ती"चे कानापर्यंत असलेले केस खुप आवडत होते....त्यामुळे "तो" "ती"च्या केसाकडे निरागस नजरेन राहुन राहुन गुपचुप पण मनसोक्त पाहत होता... तर "ती"ला त्याच्या शांत स्वभावाच विशेष आश्चर्य वाटत होत...त्याच्याकडे पाहुन "ती"ला डोळे झाकुन प्रसन्न मुद्रेत ध्यान करत असलेले गौतम बुद्ध आठवत होते..... असच न बोलताही ते दोघेही एकमेकांत आपोआप गुंतत जात होते...दोघांच्याही मनात एकमेकांविषयी एक वेगळीच निर्मळ निरागस नितळ भावणा हळुळु निर्माण होत होती....आणि अबोल्यातुन ते दोघेही एकमेकांशी खुपसारं बोलत होती....दोघांनाही एकमेकांचा सहवास कळत-नकळत हवाहवासा वाटत होता....दोघांनाही एकमेकांशी खुपसारं मनभरुन-मनमोकळ-मनसोक्त बोलाव वाटत होतं पण नक्की काय बोलाव हे "ती"ला ही समजत नव्हत आणि त्यालाही....पण वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळे जिव एकमेकांत एका निराळ्याच पण आपुलकीच्या निर्मळ भावनेनं एकदुसऱ्यात अडकु पाहत होते..... त्याच्या मावशीच आणि "ती"च्या आईच बिनाकामचं संभाषन अखेर संपलं होतं....आणि ते दोघेही एकमेकांकडे न बघताच... ईच्छा नसतानाही एकमेकांचा निरोप घेत होते...... क्रमश:::: भाग पाचवा आज राञी १० वाजता वाचायला विसरु नका मिञानो आणि वाचुन झाल्यावर स्टोरी कशी वाटली ती कमेट मध्ये सांगा..🙏✒✍sandy🖎
510 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
एका थकलेल्या हृदयाची शेवटची इच्छा कुठे आहेस .... पटकन ये .... शेवटच्या प्रवासाला निघण्या आधी मला एकदा तुला सगळं सांगायचंय…. आयुष्यभर जे सोडवण्याचा प्रयत्न केला ते कोडं तुझ्यासमोर मांडायचय… शरीर तर कधीच मेलंय … आता ह्या आत्म्याला एकदाच मुक्त करून सोडायचंय … जमलं तर जरा लवकरच ये …अगं मला वर जाऊन त्या दैवाशी पण तर भांडायचंय … आठवतेय ती शेवटची मिठी … अगदी जवळ, अगदी घट्ट घेतले होतेस तू मला पकडून … एक सांगू … शरीर झालंही असेल वेगळं तुझ्या मिठीतून … पण मन मात्र माझं आहे अजूनही तुझ्या कुशीतच अडकून … तावडीतून तुझ्या कुशीच्या ह्या मनाला सोडवून घ्यायचय… निदान त्या बहाण्याने का होईना … परत एकदा … फक्त एकदा… मला तुझ्या मिठीत सामावून जायचंय … मला तुझ्या मिठीत सामावून जायचंय … ✍sandy🖎
#

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन - ShareChat
600 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
"नुसतच कविता लिहिणं" !!!! ---------------------------------- शब्द वेडया भावनांना कल्पनेचा नाद असू दे कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं !! अलंकारांची फुलं उधळ शृंगाराचे मोती सजू दे कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं !! दु:खाचे पाढे वाच अन वेदनेची कथा असू दे कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं !! कवितेला तुझी कीव यावी ती परी बनून येऊ दे कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं !! लेखणी तुझी मोलाची मेणाचीच तलवार असू दे कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं !! त्या चुरगळलेल्या कागदात तुझे अश्रूही दिसू दे कळू दे जगाला तुझं नुसतच कविता लिहिणं !! --------🙏✒️✍️sandy✍️
#

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन - ShareChat
1.5k जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
*रामाची डायरी* एकदा श्रीरामांकडे नारदमुनी आले. श्रीरामांच्या समोर एक मोठी वही होती. नारदमुनींनी विचारले, "ही कसली वही..?" तेव्हा श्रीराम म्हणाले, " यात माझ्या भक्तांची नांवे लिहिलेली आहेत." श्रीरामांची परवानगी घेऊन त्यांनी ती वही पाहिली. पण त्यात श्री मारूतीरायांचे नाव नव्हते ! त्यांचे स्वतःचे नाव त्यात होते. त्यांना गंमत वाटली. नारदमुनीच ते ! ते श्रीमारूतीरायांकडे आले व म्हणाले, "तु स्वतःला राम-भक्त म्हणवितोस. पण तुझे नाव त्या श्रीराम-भक्तांच्या यादीत नाही ! " मारूतीरायाला आश्चर्य वाटले. मग विचार करून म्हणाले, "खरे आहे ! श्रीरामांकडे आणखी एक लहान डायरी असते. ती ते नेहमी आपल्याजवळ ठेवतात त्यांत माझे नाव असेल. नारदमुनी लगेच श्रीरामांकडे आले व त्यांना लहान डायरी विषयी विचारले. श्रीराम म्हणाले, " हे तुला कोणी सांगितले..? " तेव्हा नारदमुनींनी श्रीमारूतीरायांने सांगितल्याचे सांगितले. श्रीराम म्हणाले, " हो ! तशी छोटी डायरी आहे व ती मी नेहमी माझ्याजवळ ठेवतो. नारदमुनींनी ती पाहवयाला मागितली तर त्यात पहिले नाव श्रीमारूतीरायांचे होते. तेव्हा नारदमुनींनी अशा श्रीराम-भक्ताच्या दोन निरनिराळ्या याद्या ठेवण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा श्रीराम म्हणाले, " या मोठ्या वहीत जे भक्त माझे नाम घेतात त्याची नांवे आहेत ! व छोट्या वहीत ज्या भक्ताची नांवे मी घेतो त्यांची नावे आहेत !! " 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *यावरुन मी एखाद्या मोठ्या माणसाला ओळखतो यापेक्षा तो मोठा माणूस मला ओळखतो हे अधिक महत्वाचे आहे.* 🙏✒️✍️sandy✍️
#

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन - पुरूषोत्तम श्रीराम - ShareChat
1.1k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
💔व्यसनी नवरा💔 बहुतांश बायकांची हीच दर्दभरी कहाणी झालीय दारूबंदी केली सरकारने आता सोशल नेटवर्क च्या बंदीची वेळ आलीय रोज सकाळी आमचे हे उठतात वेड लागल्यासारखे पोस्ट टाकत सुटतात,,,, लवकर आटपा तुमचं अहो तुम्हाला काय फक्त डबा घेऊन ऑफिस ला जायच मला मात्र ऑफिस सांभाळून घर हि आवरायच समजावून समजावून रडायची वेळ आलीय सोशल नेटवर्किंग च्या बंदीची वेळ आलीय,,, अग महागाई किती वाढलीय कस सांभाळते घर मुलांच्या गरजा पुरवता पुरवता स्वतासाठी तू जगत नाहीस स्वतःकडे चुकूनही बघत नाहीस असं विचारायच यांच्या ध्यानीच नसत किती like मिळाले माझ्या पोस्टला इथेच यांच लक्ष असत घरातल्या मोठ्यानी समजवायची वेळ आलीय सोशल नेटवर्किंग च्या बंदीची वेळ आलीय,,, ऑफिस ला निघाले कि वेगवेगळ्या पोझ मध्ये सेल्फी काढत बसतात तिच सेल्फी फबी वर टाकून like ची वाट पाहत बसतात बायकोने मात्र एक फोटो काढूया म्हंटलं कि अंगावर येतात हसावं कि रडावं विचार करायची वेळ आलीय सोशल नेटवर्किंगच्या बंदीची वेळ आलीय,,, कुठेही बाहेर गेले तरी वेड्यासारखं वागतात बाहेर जरी असले तरी पोस्ट वर धन्यवाद देत सुटतात अहो कुटुंबाबरोबर आहात असं आता घरातल्या लहान मुलांना सांगायची वेळ आलीय सोशल नेट्वर्किंगच्या बंदीची वेळ आलीय,,,, पोरी बायांशी मैत्री करत सुटतात त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करत बसतात सोडा ओ फालतूपणा लेक आपली मोठी होतेय आईलाच सांगायची वेळ आलीय सोशल नेटवोर्किंगच्या बंदीची वेळ आलीय पहिले दारूच्या व्यसनांनी स्त्रियांचे आयुष्य उध्वस्त केले किती स्त्रियांनी नवऱ्याच्या या व्यसनापायी जीवन संपवले दारू परवडली पण ड्रक्स च्या आहारी गेलेला माणूस कसा बिथरतो तशीच काहीशी यांची अवस्था झालीय आता सोशल नेट्वर्किंग च्या विळख्यात सोन्यासारखे संसार उध्वस्त व्हायची वेळ आलीय सोशल नेट्वर्किंग च्या बंदीची वेळ आलीय,,,,,,,,,,, 🙏✒️✍️sandy✍️
#

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन - DREAM OOOOOOOOOOOOO PHOBBIE EHBO 3 - DEBBIE . L2 - ShareChat
1.3k जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
सुंदर कविता Busy Busy काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा खूप काम, रजा नाही मिटिंग, टार्गेट,फाईल अरे वेड्या यातच तुझं आयुष्य संपून जाईल नम्रपणे म्हण साहेबांना दोन दिस रजेवर जातो फॉरेन टूर राहिला निदान जवळ फिरून येतो आज पर्यंत ऑफिससाठी किती किती राबलास खरं सांग कधी तरी तू मनाप्रमाणे जगलास ? मस्त पैकी पाऊस झालाय धबधबे झालेत सुरू हिरव्यागार जंगला मध्ये दोस्ता सोबत फिरू बायकोलाही म्हण थोडं चल येऊ फिरून डार्लिंग डार्लिंग खेळू आपण पुन्हा होऊ तरुण पंजाबी घाल, प्लाझो घाल लाऊ द्या लाल लिपस्टिक बायकोला शब्द द्यावा करणार नाही किटकीट पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात येतील म्हातारपणाच्या काठ्या जोरजोरात बोलावं लागेल होशील ठार बहिरा मसणात गवऱ्या गेल्यावर आणतो का तिला गजरा ? तोंडात कवळी बसवल्यावर कणीस खाता येईल का ? चालतांना दम लागल्यावर डोंगर चढता येईल का ? अरे बाबा जागा हो टाक दोन दिवस रजा हसीमजाक करत करत मस्तपैकी जगा दाल-बाटी,भेळपुरी आईस्क्रीम सुद्धा खा आरोग्य उत्तम राहण्यासाठी शहरा बाहेर फिरायला जा Busy Busy काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा.... आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा.... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ, We are 40+, 50+, 60+, सो व्हॉट???💐💐 अब्दुल कलाम सांगून गेले, 'स्वप्न पहा मोठी'.. स्वप्ननगरीत जागा ठेवा माधुरी दीक्षित साठी..!💐💐 सकाळी जॉगिंगला जाताना पी टी उषा मनात ठेवा, वय विसरून बॅडमिंटन खेळा, 'सिंधूलाही' वाटेल हेवा..!💐💐 मनोमनी 'सचिन' होऊन , ठोकावा एक षटकार , घ्यावी एखादी सुंदर तान, काळजात रुतावी कट्यार..!💐💐 मन कधीही थकत नसते, थकते ते केवळ शरीर असते, मनात फुलवा बाग बगीचा, मनाला वयाचे बंधन नसते...!💐💐 फेस उसळू द्या चैतन्याचा, फुलपात्र भरू द्या काठोकाठ, द्या बंधन झुगारून वयाचे, वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ...!💐💐 *We are 40+, 50+, 60+,* *so what..?* 💃🕺🤷‍♀🤷🏻‍♂ 🙏✒️✍️sandy✍️
#

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन - ShareChat
1.6k जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
स्मिता पाटील................! स्मिता पाटील यांचा आज जन्मदिवस, एक प्रचंड ताकदीची अभिनेत्री, अवघ्या ३१वर्षे जीवनात अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळवून अर्ध्यातच या जगाचा निरोप घेऊन सर्वांच्या मनात राहिलेली ही मराठमोळी अभिनेत्री. स्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर समांतर तसेच व्यावसायिक सिनेमातही यश संपादन केलंय. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले आहे. (जन्म : पुणे, ऑक्टोबर १७, इ.स. १९५५; मृत्यू : मुंबई डिसेंबर १३, इ.स. १९८६) त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. प्राध्यापक श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म दिल्यावर सहा तासांनी प्रसूतिपश्चात आजारामुळे डिसेंबर १३, इ.स. १९८६ला त्यांचे निधन झाले. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या. स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली मुलगी होती. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील 'बातमीदार' या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला 'निशांत' आणि 'चरणदास चोर' या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. 'मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित 'भूमिका ' मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यार स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या. स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या , बंडखोर स्त्रियांच्या , आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर मास्को, न्यूर्यॉक , फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं 'सिंहावलोकन ' झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री होती. स्मिता पाटील यांची इच्छा होती, की मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह एखाद्या विवाहित महिलेप्रमाणे सजवावा. काही म्हणतात की त्यांचं लग्न झालं होतं राज बब्बरशी तर काहींच्या मते ते लिव्ह इन मध्ये राहत होते. जेव्हा स्मिता पाटिल यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मृतदेह तीन दिवस बर्फात ठेवण्यात आला होता. कारण स्मिता यांची बहीण अमेरिकेमध्ये राहत होती. जेव्हा स्मिता यांच्यावर अत्यंसंस्काराची वेळ आली त्यापूर्वी त्यांचे व्यावसायिक मेकअपमन दीपक सावंत यांनी त्यांच्या मृतदेहाचा विवाहित महिलेप्रमाणे मेकअप केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते. मराठीत "स्मिता स्मितं आणि मी" हे ललिता ताम्हाणे यांनी लिहलेले पुस्तक 📚जरूर वाचवं असं आहे. असं स्मित होणं नाही, अशी स्मिता होणे नाही ............. 🙏✒️✍️sandy✍️
#

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन - ShareChat
1.3k जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post