#

Kunal Huparikar

*UCA सकाळच्या बातम्या* १. ‘यूएई’तील भारतीयांकडून केरळसाठी भरघोस मदत, विविध व्यावसायिकांचे १२.५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन २. मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन काँग्रेसकडून मागे, काँग्रेस समितीच्यावतीने निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली. ३. शहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई, नक्षलग्रस्त भागात पैसे भरण्याची मुदत सायंकाळी चार वाजेची असणार आहे. ४. विध्वंसानंतर केरळातील पूर ओसरण्यास सुरुवात, बचावकार्याला वेग, महाराष्ट्रातून 110 डॉक्टरांच्या टीमसोबत गिरीश महाजन केरळाला जाणार ५. पावसामुळे विदर्भातील हजारो एकर शेती पाण्याखाली, पश्चिम महाराष्ट्रात धरणक्षेत्रात पावसाला जोर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ६. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी जालन्यातून माजी नगरसेवकाला अटक, एटीएसची कारवाई, दाभोलकर हत्याप्रकरणी नवे धागेदोरे सापडण्याची शक्यता ७. मारेकरी सापडला, सूत्रधार कधी? दाभोलकर हत्येप्रकरणी अंनिसचा सरकारला सवाल, दाभोलकर हत्या प्रकरणाला 5 वर्षे पूर्ण, ठिकठिकाणी मोर्चाचं आयोजन ८. बीड – परळीत मोंढा मार्केटमधील मुख्य रस्त्यावरील दुकानांना भीषण आग, चार दुकानं आगीच्या भक्ष्यस्थळी, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु ९. नॉटिंगहॅम कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड, दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या दोन बाद 124 धावा, टीम इंडियाकडे 292 धावांची भक्कम आघाडी १०. Asian Games 2018 : बजरंगची ‘सुवर्ण’ कामगिरी स्व. अटलजींना समर्पित, जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे केले पराभूत
125 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post