📝दिवाळी माहिती
#

📝दिवाळी माहिती

✍🏻दिवाळी पाडवा माहिती✍🏻 कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.
3.3k जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
#

📝दिवाळी माहिती

https://sharechat.com/post/6a5eWzG आज पासून दीपावली ला सुरुवात होत आहे. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!! *4 Nov. 2018 वसुबारस !* गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! *5 Nov. 2018 धनत्रयोदशी !* धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! *6 Nov. 2018 नरकचतुर्दशी !* सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !! *7 Nov. 2018 लक्ष्मीपूजन !* लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न ! *8 Nov. 2018 पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !* पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो ! *9 Nov. 2018 भाऊबीज !* जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे ! *ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास* *आंनदाची आणि भरभराटिची जाओ..* || शुभ दीपावली ||
617 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
#

📝दिवाळी माहिती

*(Bc)* लक्ष्मीपूजन २०१८ (सचिन मधुकर परांजपे) यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक ०७ नोव्हेंबर २०१८ (बुधवारी) सायंकाळी ६ वाजून ०१ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३३ मिनीटे या कालावधीत मूहुर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३२ मिनिटे) हा आहे. यातही सुक्ष्म मुहूर्तानुसार "संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांपासून, ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंतचा" काळ अधिक जास्त शुभ आहे हे लक्षात घेणे. (छपन्न मिनिटे) 👈 हा छप्पन्न मिनिटांचा सुक्ष्म मुहूर्ताचा कालावधी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे या काळात तुमचे पूजन सुरु हवे व इतर सर्व ऍक्टिविटिज संपूर्णपणे बंद असाव्यात ही नम्र विनंती आहे. (07.37pm to 08.33pm) या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती "श्री" या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आपल्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणी आगमन होणे अपेक्षित आहे. या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्... *See more* *(Bc)*
585 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post