तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
*शिंपले* एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे. तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे. तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते. हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.इतक्यात तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "काका, किती किंमत आहे या बाहुलीची?" दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने विचारतो "बोल तू काय देशील?" मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले,जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?" दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत. ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो. मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता. त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?" दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, "आपल्यासाठी हे केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हे शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.हीगोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल." *तात्पर्य* -- " पेरावे तसे उगवते." म्हणून केवळ पैशांच्या मागे न लागता, असे काहीतरी चांगले काम करा, जे पुढच्या पिढयांना चांगले काम करण्याची प्रेरणा देईल, सकारात्मक दृष्टीकोन देईल 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - ShareChat
14.7k जणांनी पाहिले
21 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post