ShareChat
click to see wallet page

*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* 🌾मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. यंदा 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांती व षट्तिला एकादशी आहे, संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर असते. 🎋भोगीच्या दिवशी विवाहित महिला अभ्यंगस्नान करुन घराती कुलाचार व इंद्रा देवाला स्मरून पूजन करतात. तसेच शेतकरी रब्बी हंगामातील पीकाचे पूजन करून वर्षभर घरात धनधान्याची भराभराट होऊ दे यासाठी प्रार्थना करतात.. 🎍भोगीच्या सणाला केल्या जाणाऱ्या भाजीला विशेष महत्त्व असते. त्या भाजीत पावटा, घेवडा, हरभरा, वांगे, कांद्याची पात, शेंगदाणे यांचा वापर करुन सर्व एकत्र भाजी तयार करतात. तसेच विविध धान्यांचे पीठ एकत्र करुन तिळासह भाकरी सुद्धा बनवतात किंवा तीळ लावून बाजरीची भाकरी तयार करता. या भाकरीसोबत ती भाजी खाण्याची चव भारीच असते.. *🥙हिरवा हरभरा तरारे..* *🤭गोड थंडीचे शहारे..* *🥕गुलाबी गाजर..* *🫓अन तिळदार भाकरी..* *🤤भोगीच्या भाजीची चव असते न्यारी..* *🎊सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी..🥳* *_भोगीचा सण हा सर्व कुटुंबासोबत साजरा करुन तुमचा आनंद द्विगुणित करो, या तुम्हाला सहपरीवार मराठमोळ्या भोगीच्या शुभेच्छा..!!_✍🏻* *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞 जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल दिवस आनंदित हो📿🙏🏻* #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #🌹भोगी आणि मकरसंक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

819 ने देखा
7 दिन पहले