#🙏शिवदिनविशेष📜 ⛳ *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६५६* *महंमद सुलतान हैदराबादमधील हुसेन सागर तलावाजवळ पोहोचला. त्याने हैदराबाद लुटायला सुरुवात केली. पाठोपाठ औरंगजेब ६ फेब्रुवारीला हैदराबादला पोहोचला. पण गोवळकोंड्याला वेढा घालता येईल इतके सैन्य त्याच्याकडे नव्हते. त्याने शहाजहानकडून अधिक कूमक मागवली. कुत्बशहाने दाराशी संधान बांधून शहाजहानकडे तहाची मागणी केली. दाराने शहाजहानचे जान फुंकले. शहाजहानने सैन्य मागे घेण्यास सांगितले. पण औरंगजेबाने त्याकडे लक्ष दिले नाही. शहाजहानला या दरम्यान लिहीलेल्या एका पत्रात औरंगजेब हैदराबादच्या परीसराचे वर्णन करतो - "इथल्या सृष्टीसौंदर्याबाबत काय आणि किती लिहू? मला जागोजागी मोठे तलाव, गोड्या पाण्याचे झरे, भरपूर शेते, दिसत आहेत. असा समृद्ध प्रदेश त्या नादानांच्या हाती पडलाय तो आपण जिंकून घ्यायला हवा."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२५ जानेवारी इ.स.१६५८* *मुहम्मद आदिलशहाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद १६४६ पासून विजापूरातच होता. त्यास मुहम्मद आदिलशहाने बोलावून घेतले होते. आदिलशहा ४ नोव्हेंबर १६५६ रोजी मरण पावला. त्याचे तक्तावर वारस न बसविता आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी बेगम साहेबिणीने अली नावाच्या विजापूरच्या १८ वर्षांच्या मुलास गादीवर बसविले. हा शाही घराण्यातील अस्सल राजपुत्र नाही अशा सबबीवर औरंगजेबाने विजापूरला वेढा घातला. आणि दोन्ही पक्षांनी छत्रपती शिवाजी राजांकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांना या प्रसंगात विजापूरचा पक्ष घेऊन आपले राज्य अधिक वाढवावे हे फायदेशीर आहे असे जाणवले. पण सप्टेंबर १६५७ मध्ये विजापूर सरकारने औरंगजेबाशी शांतता करार केला. छत्रपती शिवाजी राजांनी मोंगलाशी सलोखा प्रस्थापित करण्याचा निर्ण#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती