ShareChat
click to see wallet page

#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१६ जानेवारी इ.स.१६६०* *( माघ शुद्ध चतुर्दशी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार )* *नेतोजी काकांना आदिलशाही जिंकण्याचा आदेश :-* *रुस्तुमेजमानवर प्रचंड विजय मिळवून महाराज पन्हाळ्यावर आले आणि आदिलशाही जिंकण्यासाठी महाराजांनी नवीन मोहीम आखली. नेतोजी काकांच्या नेतृत्वाखाली मराठी फौज पन्हाळगड उतरली आणि विजापूर कडे कूच केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जानेवारी इ.स.१६६६* *( पौष वद्य षष्टी, शके १५७८, संवत्सर विश्वासू, मंगळवार )* *पन्हाळगडावर पराभव :-* *मिरझा बरोबर तहानंतर छत्रपती महाराजांनी पन्हाळा जिंकायचा ठरवले आणि हल्ला केला. मात्र नेतोजी काका वेळेवर मदत न मिळू शकल्याने छत्रपती महाराजांचा पराभव होऊन १००० माणसांची हकनाक कत्तल झाली आणि राजे संतापले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जानेवारी इ.स.१६७८* *ब्रिटिशांचे दक्षिण दिग्विजय मोहीम संदर्भात लिहीतात आपली जगज्जेता म्हणून प्रसिद्धी व्हावी या महत्वाकांक्षा नेत्यांनी प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी कोकणातील अत्यंत दुर्गम किल्ला जो रायरी तेथून निघून २० हजार स्वार व ४० हजार पदाती घेऊन कर्नाटकवर गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखलेल्या दक्षिण दिग्विजय स्वारीच्या दैदिप्यमान यशावर संपूर्ण हिंदुस्थानीच नव्हे तर पाश्चात्य व्यापार समूहाची देखील नजर लागून राहीली होती. तसेच या स्वारीच्या यशानंतर हिंदुस्थानच्या राजकीय पटलावर फार मोठे फेरफार होऊ शकतात असा कयास फिरंगी व्यापारी लावत होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जानेवारी इ.स.१६८०* *(पौष वद्य १० दशमी शके १६०१ संवत्सर सिद्दार्थी वार शुक्रवार)* *औरंगजेबाने शहजादा अकबरास राजपुतांवर अन् चितोडवर हल्ला करण्यास पाठविले!*#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती

856 ने देखा
6 दिन पहले