#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *३१ जानेवारी इ.स.१६६३* *(फाल्गुन शुद्ध २, द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभक्रृत, वार शनिवार)* *वेदमूर्ती नारो पाध्ये यांचे वतन सुरू ठेवले. महाराजांना कल्याणकारी राज्य निर्माण करायचे होते त्यामुळे साधूसंतांना कुठल्याही प्रकारची तोशीस लागता कामा नये यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिला. वतन मात्र कोणालाही देण्यात येत नसले तरी धार्मिक क्षेत्रातील वतने महाराजांनी पूर्वीप्रमानेच चालू ठेवली. संगमेश्ववरचे वेदमूर्ती नारो पाध्ये बीन अंतो पाध्ये आणि केसो पाध्ये हे महाराज शृंगारपुरी येथे मुक्कामी असताना त्यांना भेटले आणि त्यांच्या वतनाविषयी राजा सत्तेश्वर व तुरुकांच्या कारकिर्दित दिलेले ज्योतिष व देशोपाध्येपणाचे ताम्रपट आणि वतनाचे कागद दाखवून अर्ज सादर केला. त्यांनी महाराजांना धार्मिक बाब म्हणून सदर वतन पूर्वीप्रमाने चालू ठेवावी अशी विनंती केली. महाराजांनिही धार्मिक बाब म्हणून हे वतन चालू ठेवण्यास मान्यता देऊन शामराजपंत पेशव्यांना आदेश देऊन शिक्क्यानिशी वतनाचे पत्र दिले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३१ जानेवारी इ.स.१७२८* *श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बुऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. अकस्मात बाबापाऱ्याचा घाट उतरून राऊ भडोचवर गेले. अंदाजे ३१ जानेवारीच्या दरम्यान अलीमोहन गाठले. कोणासही स्वप्नातही वाटणार नाही, अशी घोडदौड करून निजामाला निष्प्रभ करून त्याच्या प्रांताची धूळधाण उडवली. गुजरातमध्ये शिरताच सुभेदार सरबुलंदखान याला (निजामाचे आणि याचे आपसात वैर होते) असे भासवले की, निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजरातेत सरबुलंदखानावर चालून येत आहेत. गुजरातेत यथेच्छ लु#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती