लांब जावून दूर होवून
एक लक्षात आलं
चुकलं असेल
पुढे प्रश्न पडला... कुणाचं?
उत्तर मिळालं आधी मी चुकलो
आणि जग चुकत गेलं
जे आजवर मी शिकलो...
लांब जावून दूर होवून
एक लक्षात आलं
कधी ओळखायला
कधी पटवून द्यायला
तर कधी डोळ्यावरची धुंदी
हटवायला कमी पडलो
तुझ्या की माझ्या
मी सांगणार नाही
तू विचारू नकोस...
लांब जावून दूर होवून
एक लक्षात आलं
इंधन बाजूला झालं
एक शक्यता कमी झाली
आग आता लागणार नाही
होतात काही गोष्टी भल्यासाठी
शब्द स्तब्ध झाले कुणासाठी...
(एक अनुत्तरीत सत्य)
***आबा पेडणेकर*** #😈Attitude Status #🤘मैत्री स्टेट्स #🌹प्रेमरंग #🤩खरी मैत्री #🎭Whatsapp status