ShareChat
click to see wallet page

#✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट #😇भक्ती स्टेट्स #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹शैव, वैष्णव, शाक्त, सौर आणि गाणपत्य हे आपल्याकडचे पाच प्रमुख उपासना पंथ. यातल्या पहिल्या चारांचा समावेश महाराष्ट्राच्या आराध्यदैवतात म्हणजेच श्रीखंडेराय म्हाळसा यांत झाला आहे. श्रीखंडेरायांना मार्तंड भैरव म्हणतात. मार्तंड म्हणजे सूर्य; त्यांचे वाहनही सूर्याचे वाहन म्हणजेच घोडा आहे. ते भैरवस्वरूप असले तरी उग्र नाहीत. भैरव असल्याने सोबत श्वान आहेच. श्रीम्हाळसा देवी यांना एकीकडे पार्वतीस्वरूप तर दुसरीकडे मोहिनीरुपातील विष्णुस्वरूप म्हणून पूजले जाते. अशा प्रकारे चारही पंथांचा समावेश या पूजनात होतो. मल्ल राक्षसाला ठार केलं म्हणून मल्लारी; खंडा म्हणजेच खड्ग हाती असल्याने श्रीखंडेराय / खंडोबा; म्हाळसादेवीचे पती म्हणून म्हाळसाकांत. श्रीमहालसा नारायणीच्या परिवार देवतेंत श्रीखंडेरायांना विशेष स्थान आहे. मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव प्रारंभ. यळकोट यळकोट जय मल्हार!

1.1K जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी