Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
21.6K views
दादा… मोबाईल हातात घेतला की मन नकळत म्हणतं *“दादा पुन्हा नॉट रिचेबल…”* पण यावेळी ते शब्द बोचतात… कारण आता खरंच दादा नॉट रिचेबल झालेत… कायमचे. लोकांचे प्रश्न, व्यथा, आशा घेऊन येणारी गर्दी… दहा मिनिटात हातात अर्जांचा ढीग… आणि त्या प्रत्येक अर्जामागे उभा असलेला एक सामान्य माणूस… दादा बसल्या जागी फोन लावायचे, “हे काम आजच व्हायला पाहिजे” असा आदेश देणारा नेता आज शांत झोपलेला आहे… 😭 आज त्यांच्या जवळ पडलेले रक्ताने माखलेले अर्ज फक्त कागद नाहीत ती त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेची साक्ष आहेत…त्या अर्जांमध्ये लोकांचा विश्वास आहे,त्या अर्जांमध्ये दादांचं जिवंतपण आहे… सत्तेपेक्षा सेवा मोठी मानणारा, पदापेक्षा माणूस जपणारा, राजकारणातही माणुसकी जिवंत ठेवणारा अजितदादांसारखा नेता पुन्हा होणार नाही… आज मन सुन्न आहे… डोळे ओलावलेत…शब्द अपुरे पडतायत… *Miss You Dada…* तुमचं असणं आज खूप जाणवतंय… तुमचं नाहीसं होणं अजूनही स्वीकारता येत नाही… 💔 *दादा, तुम्ही आमच्यातच राहाल प्रत्येक अर्जात, प्रत्येक प्रश्नात,आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या आठवणीत…!* #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #💔महाराष्ट्र सुन्न! राज्यावर शोककळा😭 #🙏लाडक्या दादांना उद्या अखेरचा निरोप💔 #📲व्हायरल व्हिडिओ