❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
1.5K views
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असून, आता ती २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पुन्हा तयारी सुरू करणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्याने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमधून सुवर्णपदकाच्या लढतीतून अपात्र ठरल्यानंतर तिने गेल्या वर्षी निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, पॅरिसमध्ये जपानच्या चार वेळा विश्वविजेत्या युई सुसाकीवर विजय मिळवून ऑलिम्पिक अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती 💪🌟 #📝स्पोर्ट्स अपडेट्स📺 #sports #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲