Failed to fetch language order
ब्रेकिंग न्यूज
1K Posts • 2M views
#📢भारताची फुलराणी निवृत्त!🏸 भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने नुकतीच स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, गुडघ्याच्या दुखापती आणि शरीराच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेमुळे ती हा निर्णय घेत आहे, असे तिने स्पष्ट केले आहे, ज्यात तिने 2023 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. निवृत्तीची कारणे: गुडघ्याची दुखापत: रिओ ऑलिंपिक 2016 मध्ये झालेल्या गंभीर दुखापतीनंतर तिच्या गुडघ्याच्या कार cartilage (कूर्चा) झिजल्या आहेत आणि तिला संधिवात (arthritis) झाला आहे, ज्यामुळे तिला आता पूर्वीसारखे प्रशिक्षण आणि स्पर्धा करणे शक्य नाही. शारीरिक मर्यादा: तिचे शरीर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाचा ताण सहन करू शकत नाही, असे तिने सांगितले आहे. कारकिर्दीतील महत्त्वाचे क्षण: लंडन ऑलिंपिक 2012: भारतासाठी पहिले बॅडमिंटन ऑलिंपिक पदक (कांस्य) जिंकले. जागतिक क्रमवारीत अव्वल: 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली. सुपर सिरीज जिंकणारी पहिली भारतीय: इंडोनेशिया ओपन जिंकून सुपर सिरीज स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ठरली. कॉमनवेल्थ गेम्समध्ये यश: अनेक पदके जिंकली, ज्यात सुवर्णपदकांचा समावेश आहे. सायनाने 'हाऊस ऑफ ग्लोरी' पॉडकास्टमध्ये बोलताना याबद्दल माहिती दिली, ज्यात तिने सांगितले की ती स्वतःच्या अटींवर खेळली आणि आता वेळ संपली आहे, असे तिला वाटते. #📝स्पोर्ट्स अपडेट्स📺 #🏸बॅडमिंटन #🏸सायना नेहवाल #ब्रेकिंग न्यूज
29 likes
1 comment 35 shares
देशातील तंबाखू शौकिनांना केंद्र सरकारने मोठा धक्का दिलाय. संसदेने 'सेंट्रल एक्साइज (संशोधन) विधेयक, २०२५' मंजूर केले असून, यामुळे सिगरेट, सिगार, हुक्का आणि खैनीवरील उत्पादन शुल्कात प्रचंड वाढ करण्यात आलीय. या निर्णयामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. नवीन दुरुस्तीनुसार, सिगरेटवरील उत्पादन शुल्क प्रति १,००० स्टिकमागे २००-७३५ रुपयांवरून थेट २,७०० ते ११,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेय. ही वाढ सिगरेटच्या प्रकारावर आणि लांबीवर अवलंबून असेल. खैनीवरील शुल्क २५% वरून १००% पर्यंत, तर हुक्का तंबाखूवर २५% ऐवजी ४०% कर आकारला जाईल. सरकारी अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, सध्या बाजारात १८ रुपयांना मिळणारी एक सिगरेट लवकरच ७२ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हे विधेयक सादर केले होते. #ताज्या बातम्या #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #🆕ताजे अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
79 likes
86 shares
कर्मचाऱ्यांना 15 जानेवारीला मतदानासाठी भरपगारी सुट्टी | Paid Leave For Election राज्यातील नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी.... 15 जानेवारी रोजी मुंबई, ठाण्यासह 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी सरकारने 'भरपगारी सुट्टी' जाहीर केलीय.... खासगी कंपन्या, आयटी पार्क्स आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू असेल.... मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.... तसंच सुट्टी न देणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाईचा इशारा उद्योग आणि कामगार विभागाने दिलाय.... #📢मनपा निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक! #मनपा निवडणुकीची रणधुमाळी #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
832 likes
1135 shares