ㅤ🅚̣̣̣𝐒𝐡𝐢𝐫𝐬𝐚𝐠𝐚𝐫𝄟⃝🚩
1.5K views
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली आहे. उद्या #🏛️राजकारण त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार असून, महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळण्याचा मान मिळणार आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच एका महिलेची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागत आहे. उद्या सुनेत्रा पवार या पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व राहिले आहे, मात्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांसारख्या सर्वोच्च पदांवर महिलांना संधी मिळाली नव्हती. सुनेत्रा पवार यांच्या या निवडीमुळे राज्याच्या राजकारणात महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आणि अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार या एक सक्षम चेहरा म्हणून समोर आल्या आहेत. #🆕ताजे अपडेट्स #📢मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय वाचा!👉