aditya jadhav
5.4K views
4 days ago
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे ते थोरले पुत्र होते. लहानपणीच आईचे छत्र हरपल्यानंतर राजमाता जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला. संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव महाराणी येसूबाई होते. त्यांना दोन अपत्ये होती - कन्या भवानीबाई आणि पुत्र छत्रपती शाहू महाराज. शंभूराजे अत्यंत विद्वान होते, त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला. वडिलांच्या निधनानंतर १६ जानेवारी १६८१ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. आपल्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज आणि जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध तब्बल १२० लढाया केल्या, पण एकही लढाई ते हरले नाहीत. त्यांनी औरंगजेबाच्या लाखोच्या फौजेला एकट्या स्वराज्याने झुंजवत ठेवले. मुघलांच्या कैदेत असताना औरंगजेबाने त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास सांगितले पण महाराजांनी आपला स्वाभिमान आणि धर्म सोडण्यास नकार दिला. अखेर ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. . . #1mviews #viralreels #reelinstagram #SambhajiMaharaj #ChatrapatiSambhajiMaharaj #swarajyarakshaksambhaji #MarathaHistory #shivajimaharaj #🚩छत्रपति शिवाजी महाराज #maharashtra #HinduSamrat #HistoryOfIndia #Shambhuraje #ViralReels #TrendingNow #MarathaEmpire #Swarajya #Tulapur #MarathiPride #JaiShivray #ShambhuRajeStatus