Kiran Gosavi
534 views
1 days ago
## ‼️ गजानना श्री गणराया ‼️ *श्री महोत्कट विनायक ही गणेश पुराणानुसार सतयुगातील गणेशाची पहिली मूर्ती आहे. या अवतारात गणेशाने सिंह हे वाहन म्हणून वापरले आणि तो १० हात असलेला तसेच रक्तासारखा रंग असलेला दशभुजाधारी अवतार होता. ते माता अदिती आणि महर्षी कश्यप यांचे पुत्र म्हणून 'काश्यपेय' म्हणूनही ओळखले जातात. ज्यांनी असुर शक्तींचा नाश करण्यासाठी अवतार घेतला होता. या अवताराची कथा 'गणेश पुराण' मध्ये आढळते, सतयुगात 'देवांतक' आणि 'नरांतक' या दुष्ट जुळ्या असुरांचा त्रास वाढला होता. त्यांच्या संहारासाठी हा अवतार झाला होता.*