*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞 🌹*
*🧠कृष्ण म्हणजे अमर्यादितपणा प्रेमातही आणि युद्धात ही🧘🏻♂️*
🎊कृष्ण हे केवळ एक ऐतिहासिकदृष्ट्या व्यक्तीमत्व नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे अमर्यादित जाणीव आहे. त्यांचे अस्तित्व मोजमापात बसणारे नाही, कारण तो प्रेमात जितका अथांग आहे, तितकाच युद्धातही निर्णायक आहे. कृष्णाला समजून घ्यायचे असेल तर त्याला फक्त परमेश्वर म्हणून नाही, तर जीवनदर्शन म्हणून पाहावे लागते.
💞कृष्णाचे प्रेम हे अटीशर्तींच्या पलीकडचे आहे. राधेवरच त्यांचे प्रेम मालकीचे नाही, तर समर्पणाचे आहे. भेटीत कमी आणि विरहात अधिक गहिरे असलेले हे प्रेम, “माझ” या शब्दात अडकलेले नाही. गोकुळात कृष्ण माखनचोर आहे, गवळ्यांचा सखा आहे, गायींचा गोपाळ आहे. त्यांचे प्रेम सर्वांसाठी समान आहे—राजा असो वा रंक, स्त्री असो वा पुरुष. म्हणूनच कृष्णाचे प्रेम मर्यादित नात्यांमध्ये अडकत नाही, ते आत्म्यापर्यंत पोहोचते.
🏇🏻 जेव्हा पण हाच कृष्ण युद्धभूमीवर उभा राहतो, तेव्हा तो तितकाच कठोर आणि स्पष्ट दिसतो. महाभारतात कृष्ण स्वतः शस्त्र उचलत नाही, पण त्यांचे प्रत्येक शब्द शस्त्रापेक्षा ही तीव्र आहे. अर्जुनाच्या संभ्रमावर तो प्रेमाने हात ठेवतो, पण निर्णयासाठी कठोर सत्य सांगायला मागे हटत नाही. “धर्मासाठी युद्ध टाळणे हा अधर्म आहे,” हे सांगताना तो भावना नाही, तर कर्तव्य महत्त्वाचे ठरवतो.
🧘🏻♂️कृष्णाची अमर्यादितता याच ठिकाणी प्रकर्षाने दिसते. तो कुणाचाच अंध समर्थक नाही; तो सत्याचा साथीदार आहे. जिथे अन्याय आहे, तिथे तो उभा राहतो—मग तो कंसाविरुद्ध असो, की कुरुक्षेत्रात अधर्माविरुद्ध. प्रेमात तो सर्वस्व देतो, आणि युद्धात तो निर्णयाचे ओझे उचलतो. दोन्हीकडे त्याचा हेतू एकच असतो—जीवनाचे संतुलन..
📖कृष्ण शिकवतो की प्रेम हे दुर्बलतेचे लक्षण नाही आणि युद्ध हे क्रौर्याचे प्रतीक नाही. योग्य वेळी प्रेम व्यक्त करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच गरज पडल्यास अन्यायाविरुद्ध उभे राहणेही आवश्यक आहे. जीवनात प्रत्येक क्षणी प्रेम असतेच असे नाही, कधी कधी कुरुक्षेत्रही सामोर येते आणि या वेळी दोन्ही ठिकाणी कृष्णासारखी समजूत हवी असते.
*👏🏻म्हणूनच कृष्ण म्हणजे "अमर्यादितपणा" भावनेतही आणि बुद्धीतही, मृदुत्वातही आणि कठोरतेतही. तो शिकवतो की जीवन एकाच रंगाचे नसते; प्रेम आणि युद्ध, दोन्हींच्या समतोलातूनच खरे माणसाचे जीवन घडते..!!✍🏻*
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रविवार आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #🙏शुभ सकाळ,धम्म प्रभात, गुड मॉर्निंग, जय भीम 🙏 #महानुभाव पंथ